टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या २० वर्षांच्या अभिनेत्रीने मालिकेचं शुटिंग सुरू असताना मधल्या ब्रेकमध्ये गळफास घेतला. सेटवर हसत-खेळत शूटिंग करणाऱ्या तुनिषाने अचानक एवढं मोठं पाऊल उचलल्याने सेटवरील लोकांसह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, तुनिषाच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच तुनिषाचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याच्यावर अभिनेत्रीच्या नातेवाईकांनी आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा होती गरोदर? बॉयफ्रेंडचा उल्लेख करत पोलिसांच्या सुत्रांनी दिली धक्कादायक माहिती

तुनिषाच्या एका जवळच्या नातेवाईकाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, “मालिकेतील सह-कलाकार शिझान तुनिषाचा छळ करत होता. शिझान तुनिषाचा खूप जवळचा मित्र होता, पण त्याने अचानक तिच्याशी बोलणं सोडून दिलं होतं, त्यामुळे ती नैराश्यात होती. मागच्या आठवडाभरापासून शिझान तिला त्रास देत असल्याचे तुनिषा सांगत होती. आम्ही शिझानशी बोललो होतो आणि तिला त्रास देऊ नकोस, असं सांगितले होतं. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली आहे.”

दरम्यान, जागतिक पुरुष दिनाच्या दिवशी तुनिषाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यात तिने शिझानबरोबरचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. “मला अशाच प्रकारे उंचावणाऱ्या माणसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा! माझ्या आयुष्यातील सर्वात मेहनती, पॅशनेट, अत्यंत उत्साही आणि सर्वात सुंदर माणूस! तू काय आहेस, हे तुला माहित नाही आणि हिच सर्वात सुंदर गोष्ट आहे. पुरुषांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी केलेले योगदान आणि त्याग ओळखण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची हीच वेळ आहे! सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं होतं.

तुनिषा शर्मा ‘अली बाबा दास्तान ए काबुल’चे शूटिंग करत होती. चहाच्या ब्रेकदरम्यान तुनिषा टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ बाहेर आली नाही, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma suicide relatives alleges boyfriend sheezan mohammed khan for harassing her hrc