अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानवर आरोप केले. त्यानंतर शिझान खान पोलीस कोठडीत आहे. अशातच आता तुनिषाच्या आईने शिझानवर नव्याने आरोप केले आहेत. तुनिषाने गळफास लावल्याचं कळालं तेव्हा ती श्वास घेत होती आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले असते तर तिला वाचवता आलं असतं, असा आरोप तिच्या आईने केला आहे.

“एंड ऑफ द चाप्टर” बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत गैरहजर असलेल्या रुचिरा जाधवची पोस्ट; रोहितबद्दल म्हणाली…

mamata kulkarni News
Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य

“ही आत्महत्या किंवा खून असू शकतो. मी हे म्हणतेय, कारण शिझान तिला दूरच्या एका रुग्णालयात घेऊन गेला होता. सेटपासून ५ मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल्स होती. तिला जवळ का घेऊन गेला नाही? ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, तेव्हा श्वास घेत होती, जिवंत होती आणि तिला वाचवता आलं असतं,” असं वनिता शर्मा एएनआयशी बोलताना म्हणाल्या.

Video: “शिवरायांनी दिलेलं वचन चार पिढ्यांनंतर बाजीराव पेशवेंनी…” शरद पोंक्षेंनी सांगितला बाजीरावांचा मोठेपणा

शिझान खानच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की वनिता आपल्या मुलीच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवत होत्या आणि तिला पैसे देत नव्हत्या. तसेच तुनिषाचे आईबरोबर चांगले संबंध नव्हते, हा दावा त्यांनी फेटाळला आहे. “आमचं नातं खूप चांगलं होतं. शिझानच्या आईने मला माझ्या मुलीबरोबरच्या नात्याबद्दल सांगण्याची गरज नाही.” यावेळी त्यांनी २१ डिसेंबरची तुनिशाची एक क्लिप देखील शेअर केली, ज्यात ती शिझानला “माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करते हे मी सांगू शकत नाही,” असं म्हणते.

Bigg Boss 16: साजिदला पाहताच फराह खान भावूक; शिव ठाकरेला मिठी मारत म्हणाली “तू माझा…”

दरम्यान, वनिता शर्मांनी शिझान आणि त्याच्या कुटुंबावर मुलीचा धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पण, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र असे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Story img Loader