बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करतात. अलीकडेच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सहनशील, सतत अत्याचार होणाऱ्या भूमिका…”, अभिनेत्री तेजश्री प्रधानचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मराठी मालिका आणि डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री मीरा जोशीने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. उरणच्या सुमद्रकिनाऱ्यावरील बॉयफ्रेंडबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत मीराने नात्याची कबुली दिली आहे. मीराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ‘प्यार का पंचनामा’मध्ये नुसरत भरुचाने बिकिनी घालण्यास दिलेला नकार, कारण…

अभिनेत्री मीरा जोशीने जांभळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान करुन उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर खास फोटोशूट केलं आहे. बॉयफ्रेंडबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘ड्रंक इन लव्ह’ असं कॅप्शन देत, पुढे बॉयफ्रेंड, रिलेशनशिप, रिलेशनशिप गोल्स, लव्ह असे हॅशटॅग्ज दिले आहेत. मीराने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर तिच्या चाहत्यांसह काही कलाकार मंडळींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : ‘रॉनी और रानी…’च्या रिमेकमध्ये ३५ वर्षांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या जागी कोणाला घेशील? ‘ही’ नावं घेत करण जोहर म्हणाला…

दरम्यान, मीरा जोशी अभिनेत्री असण्याबरोबरचं उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. आता मीरा तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आणि नाव केव्हा उघड करणार याची तिचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuza maza breakup fame meera joshi shared romantic photos with boyfriend sva 00