‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. अशातच ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – नेपाळी थाळीवर ताव मारून मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे परतले मायदेशी, फोटो व्हायरल

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”

टीआरपीच्या यादीत टॉप-५मध्ये आपलं स्थान टिकवून असणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा १६ जूनला महाअंतिम भागाने शेवट होणार आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेरच्या महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे. खऱ्या बाप-लेकीची म्हणजेच मल्हार-स्वराची भेट महाअंतिम भागात होणार आहे. मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं असून मालिकेतील सर्व कलाकार मंडळी फिरायला गेले होते. यावेळी या कलाकारांनी सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. हा व्हिडीओ स्वरा म्हणजे बालकलाकार अवनी तायवाडेच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये अवनीसह अभिनेता अभिजीत खांडकेकर, तेजस्विनी लोणारी, उर्मिला कोठारे, पल्लवी वैद्य, प्रथमेश परब असे दिग्दर्शकापासून कलाकार मंडळी ‘अंगारों’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा!” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “इतरांसाठी जगणारा माणूस…”

हेही वाचा – Video: शशांक केतकरच्या तक्रारीनंतर एका रात्रीत BMCची कारवाई, आभार मानत म्हणाला, “फक्त तोच भाग नाही, अख्खी मुंबई…”

दरम्यान, २ मे २०२२पासून सुरू झालेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मल्हार, मोनिका, वैदही, स्वरा, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने तर प्रेक्षकांचा चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत कधी दुसऱ्या स्थानावर, कधी तिसऱ्या स्थानावर तर कधी चौथ्या स्थानावर असायची. गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीतही ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका चौथ्या स्थानावर आहे. पण आता उद्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा शेवट गोड होताना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader