‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तुझेच मी गीत गात आहे’. अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला काठोरे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, पल्लवी वैद्य असे अनेक तगडे कलाकार मंडळी असलेली ‘तुझेच मी गात आहे’ मालिका खूप गाजली. टीआरपीच्या शर्यतीतही मालिका अव्वल स्थानावर होती. पण, गेल्या वर्षी १६ जूनला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा शेवट झाला. ज्या क्षणाची प्रेक्षक दोन वर्ष आतुरतेने वाट पाहत होते, त्या क्षणाने या मालिकेचा शेवट झाला. मल्हारला स्वरा त्याची खरी लेक असल्याचं दाखवत ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हार म्हणजे अभिनेता अभिजीत खांडकेकर सध्या काय करतो? जाणून घ्या…

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिजीत खांडकेकर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेनंतर अभिजीत ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकला. या चित्रपटात तो दादाजी भुसे यांच्या भूमिकेत दिसला. त्याचबरोबर अभिजीत ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ या कार्यक्रमात झळकला. त्यानंतर अभिजीत विविध कार्यक्रमात पाहायला मिळाला.

काही दिवसांपूर्वी अभिजीतचं ‘मनमोही’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं. गायिका सावनी रविंद्रबरोबर तो या गाण्यात झळकला. सध्या अभिजीतच्या कझाकस्तानच्या ट्रीपचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामुळे अभिजीत चर्चेत आला आहे.

अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरने नुकतेच कझाकस्तानच्या ट्रीपचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये अभिजीत पत्नी सुखदाबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बर्फाळ प्रदेशात अभिजीत पत्नीबरोबर डान्स करताना दिसत आहे. अभिजीत आणि सुखदाच्या या ट्रीपच्या फोटो, व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, अभिजीत खांडकेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका चांगलीच गाजली. अभिजीतच्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्ष अधिराज्य गाजवलं.

Story img Loader