‘तुझेच मी गीत गात आहे’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गेली कित्येक महिने स्वरा ही मुलगी स्वराज म्हणून कामतांच्या घरी राहत असल्याचं प्रेक्षकांना ठाऊक होतं. परंतु, याबाबत घरातील इतर कोणालाही कल्पना नव्हती. अखेर ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी पिहू स्वराजला राखी बांधत असताना, स्वराज हा मुलगा नसून मुलगी असल्याचं सत्य मल्हारसमोर उघड होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “मी टक्कल केलं असतं तर…”, वडिलांच्या निधनानंतर केस कापण्याबद्दल स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी

पिहू स्वराजला राखी बांधत असताना, मोनिका सगळे पुरावे मल्हारसमोर उघड करणार आहे. त्याचा जन्मदाखला, त्याचे लांब केस आणि स्वराज खऱ्या आयुष्यात मुलगी असल्याचे फोटो पाहून मल्हारला धक्का बसतो. “मोनिकाच्या कपटी डावाला यश मिळून मल्हारसमोर येणार स्वराज मुलगी असल्याचं सत्य” असा प्रोमो मालिकेच्या टीमने शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने आई-वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “ज्यांनी मला घडवलं…”

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील हा महत्त्वाचा भाग सोमवार ११ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिहू राखी बांधत असताना मोनिका तिला थांबवते आणि थेट स्वराजचा वीग काढते असं नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा : बेबी बंपचे मॉर्फ फोटो अन् गरोदरपणाच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने सोडलं मौन; म्हणाली, “या लोकांना…”

स्वराज मुलगी असल्याचं सत्य सर्वांसमोर आल्यावर मल्हार काय निर्णय घेणार? मल्हार स्वराजचं सत्य स्वीकारणार का? तो स्वराजला घरात ठेवणार की बाहेर काढणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेटकऱ्यांनी आम्ही हा भाग पाहण्यास प्रचंड उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.