छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. या बिग बॉसमुळे मराठीतील अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी. बिग बॉसपूर्वी तेजस्विनीनं बरेच चित्रपट आणि मालिका केल्या. पण तिला बिग बॉसनंतर विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात तल्लख बुद्धी व उत्तम खेळीच्या जोरावर तेजस्विनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या तेजस्विनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत पाहायला मिळत आहे. नुकतंच तिनं सध्याच्या राजकारणावर परखड मत व्यक्त केलं आहे; जे चांगलंच चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार अडकला लग्नबंधनात; ‘या’ अभिनेत्रीबरोबर घेतले सात फेरे

हेही वाचा – “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या युट्यूब चॅनेलवरील छापा काटा या कार्यक्रमात तेजस्विनी लोणारी सहभागी झाली होती. त्यावेळी तिला राजकारणाविषयी विचारण्यात आलं. ती म्हणाली की, “माझ्या आईला राजकारणाविषयी खूप माहिती आहे. त्यामुळे मी लहानपणापासूनच खूप राजकारण बघितलंय. म्हणून मी बिग बॉसचा प्रवास करू शकले. पण सध्याच राजकारण खूप हास्यास्पद वाटतंय. खरच आजूबाजूला खूप मोठ्या समस्या आहेत. पण कुठलाही राजकीय कार्यक्रम बघा, त्यामध्ये फक्त एकमेकांवर टीका केली जाते. सध्या हे महत्त्वाच नाहीये. तुम्ही इथून तिथून उड्या मारताय, ठीक आहे. आम्ही मुर्ख आहोत, तुम्हाला मतदान करतोय.”

हेही वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने मारली बाजी; ‘आई कुठे काय करते’ मालिकेला टाकलं मागे, पाहा TRP यादी

पुढे तेजस्विनी म्हणाली की, “कुठल्याही राजकीय कार्यक्रमांमध्ये ना शेतकऱ्यांचं बोलतात, ना सर्वसामान्यांच्या समस्यांबद्दल बोलतात. त्यामध्ये फक्त याने कसा मुर्खपणा केलाय, हा किती चुकीचा आहे एवढंच बोललं जातं. त्यानंतर मीडिया यावर दिवसभर खेळणार. पाऊस, पाणी, शेतकरी, शाळा, शिक्षण पद्धती याबद्दल काहीच बोलत जात नाही. तोचतोच पणा बातम्यांमध्ये असतो. जरी मी राजकारण्याच्या बातम्या पाहिल्या नाही, तरी माझी आई मला दिवसभराच्या अपडेट देत असते.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuzech mi geet gaat aahe fame tejaswini lonari react on today maharashtra politics pps