‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुझेच मी गीत गात आहे.’ या मालिकेत नुकताच नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. मोनिकाचा प्रियकर शुभंकर ठाकूर याची एन्ट्री झाली. त्यामुळे आता मालिकेचे कथानक वेगळ्या वळणावर आलं आहे. अशातच पिहू आणि स्वराज एकत्र झाल्याचं पाहायला मिळणार आहे. पण मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार? वाचा…
हेही वाचा – अर्जुन-सायलीचं नातं आणखी बहरणार; ‘ठरलं तर मग’च्या आजच्या एपिसोडमध्ये ‘या’ खास गोष्टी घडणार
‘सुरांचे छोटे महारथी’ ही स्पर्धा स्वराज जिंकतो. पण यादरम्यान मोनिकाला तिचा भूतकाळ दिसल्यामुळे म्हणजेच प्रियकर शुभंकर समोर आल्यामुळे ती बिथरते. त्यानंतर ती घाबरून कार्यक्रमातून पळ काढते आणि थेट माहेरी जाऊन वडिलांबरोबर भांडताना, मागच्या भागात पाहिलं आहे.
हेही वाचा – “अंगावरचे कपडे काढून देणारा माणूस” अशोक सराफ यांनी सांगितला नाना पाटेकरांबरोबरच्या मैत्रीचा किस्सा, म्हणाले…
आजच्या भागात स्वराज ट्रॉफी घेऊन वैदहीच्या सामनाशी गप्पा मारतो. “खरंतर आई तू या क्षणाला असायला पाहिजे होतीस. पण मला माहित आहे, तू जिथे आहेस, तिथून मला बघतं आहेस. तुझ्यासारखी दिसणारी तू मला मंजू आई पाठवली आहेस,” अशा तो गप्पा मारतो. त्यानंतर स्वराज पिहूच्या खोलीत जातो. तेव्हा पिहू रडत बसली असते. हे पाहून स्वराज तिला म्हणतो, “पिहू तू हरली नाहीस. तू फस्ट रनरअप आली आहेस. पाहिजे तर तू माझ्या ट्रॉफिवर तुझं नाव लिही.” हे ऐकून पिहूला खूप वाईट वाटू लागतं. ती स्वराजला घट्ट मिठ्ठी मारून रडू लागते. अशाप्रकारे स्वराज आणि पिहू एकत्र येतात.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
याचवेळी मल्हार खोलीच्या बाहेर उभा राहून स्वराज आणि पिहूचं बोलणं ऐकतं असतो. खरा कलाकार काय असतो हे स्वराजने पुन्हा एकदा सिद्ध केलं असं म्हणतो आणि तोही पिहू आणि स्वराज जवळ येऊन दोघांना घट्ट मिठ्ठी मारतो. दुसऱ्याबाजूला मोनिका आपल्या वडिलांबरोबर भांडून पुन्हा घरी परते. त्यावेळेस मल्हार तिला कार्यक्रमातून अचानक निघू जाण्याविषयी विचारतो. पण तेव्हा मोनिका मल्हारवर पिहू हरल्याचा आरोप करते. तितक्यात स्वराज मोनिकाला मिठाई द्यायला येतो. मात्र तेव्हाही नेहमीप्रमाणे मोनिका त्याचा अपमान करते. पण तरीही तो मोनिकाला समजून घेतो.