हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी एकत्र ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केलं होतं. यामध्ये हार्दिकने राणादा, तर अक्षयाने अंजली पाठक हे पात्र साकारलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्राच्या घराघरांत ही लाडकी जोडी राणादा व पाठकबाई या नावाने ओळखली जाते. मालिकेने निरोप घेतल्यावर पुढे काही महिन्यांनी राणादा व अंजली खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार झाले.
हार्दिक-अक्षयाने मालिका संपल्यावर गुपचूप साखरपुडा उरकल्यावर २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात पारंपरिक पद्धतीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच पाहुणे उपस्थित होते. सध्या ही लोकप्रिय जोडी सुखाचा संसार करत असून ते दोघेही सणवार, वाढदिवस कुटुंबीयांबरोबर एकत्र साजरे करतात. अभिनेत्याच्या वडिलांचा वाढदिवस देखील नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी हार्दिकने त्याच्या वडिलांना खास आलिशान गाडी गिफ्ट केली आहे.
हेही वाचा : ‘शुभविवाह’ फेम अभिनेत्याच्या पायाला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला, “वय काही असो…”
“माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी हे खास गिफ्ट Happy Birthday पप्पा” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. गाडी खरेदी करताना संपूर्ण जोशी कुटुंब एकत्र गेल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय सासऱ्यांच्या वाढदिवशी अक्षयाने देखील “Happy Birthday पप्पा” म्हणत हार्दिकच्या वडिलांबरोबर खास फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : अर्जुन-रविराजमध्ये दिलजमाई! सुभेदारांच्या घरी पोहोचले किल्लेदार, मालिका रंजक वळणावर…
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर २०२२ मध्ये दोघांनी लग्न केलं.