टीव्ही अभिनेता ईश्वर कुमार यांनी ‘एफआयआर’, ‘जीजा जी छत पर है’, ‘मे आय कम इन मॅडम’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचले. अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे ईश्वर कुमार सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांची परिस्थिती हलाखीची असून उपचाराकरिताही त्यांच्याजवळ पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं.
‘आजतक’ने दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर कुमार किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. “मला गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराचा त्रास होत आहे. त्यामुळे माझ्या पायालाही सूज आली आहे. मला लघुशंकेवरही नियंत्रण ठेवता येत नाही. मी सुरुवातीला डायपर वापरायचो. पण आता ते खरेदी करणंही शक्य नसल्यामुळे मला पेपर किंवा कागदाचा वापर करावा लागतोय”, असं ते ‘आजतक’शी संवाद साधताना म्हणाले.
हेही वाचा>> “लोकांना आवडतं म्हणून ते…”, लावणी कार्यक्रमातील चाहत्यांच्या गर्दीवरुन गौतमी पाटील स्पष्टच बोलली
हेही वाचा>> “माझा लावणीचा कार्यक्रम नसून डीजे…”, गौतमी पाटीलने दिलं स्पष्टीकरण
पुढे ते म्हणाले, “सुरुवातीला मी आयुर्वेदिक उपचार घेत होतो. परंतु, आता डॉक्टरकडे जाण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. माझा भाऊ सिजोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त आहे. सुरुवातीला त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, नंतर त्यांनीही उपचार करण्यास नकार दिल्याने आता त्याला अनाथाश्रमात ठेवलं आहे. त्यासाठी मला दर महिन्याला तीन हजार रुपये भरावे लागतात. माझी आईही लॉकडाऊनपासून अंथरुणाला खिळून आहे”.
हेही वाचा>> ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट निर्मात्यांची घोषणा
“माझ्या आजारपणामुळे मला काम करणंही शक्य नाही. आता माझी बहीण आईची व माझी काळजी घेते. माझ्या आजारपणामुळे मला कामही मिळत नाहीये. मला विश्वास आहे की, या आजारातून मी लवकर बरा होईन. नंतर ऑडिशन देऊन मला काम मिळवता येईल”, असंही ते पुढे म्हणाले.