Actor Nitin Chauhan Death: टीव्ही अभिनेता नितीन चौहान उर्फ नितीन सिंहच्या निधनाचे कारण स्पष्ट झाले आहे. नितीनच्या काही मित्रांनी पोस्ट केल्यामुळे त्याचं निधन झाल्याची बातमी चाहत्यांना समजली, मात्र कारण अस्पष्ट होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीनने आत्महत्या केली आहे. त्याने त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. तो अवघ्या ३५ वर्षांचा होता. त्याला पत्नी व एक मुलगी आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नितीनने गुरुवारी (७ नोव्हेंबरला) मुंबईतील गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. काम मिळत नसल्याने तो नैराश्यात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा पत्नी आणि मुलीबरोबर राहत होता. गुरुवारी संध्याकाळी त्याची पत्नी मुलीला घेऊन बाहेर गेली होती. घरी फक्त नितीन एकटाच होता, त्यावेळी त्याने गळफास घेतला.

Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

हेही वाचा – ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नितीनची पत्नी काही वेळाने घरी आली तेव्हा तिने दार ठोठावले, पण नितीने दार उघडले नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले. घरात नितीन बेडशीटने गळफास घेतलेल्या अवस्थे आढळला. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा – “तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय आफळे म्हणाले, “प्राथमिक चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नितीन चौहानला गेल्या काही वर्षांपासून काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे तो नैराश्यात होता.” नितीनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

नितीन मागील काही वर्षांपासून नैराश्यावर उपचार घेत होता. थेरपी व औषधं घेऊनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही, असं वृत्त आज तकने दिलंय. नितीनने रिॲलिटी शो ‘दादागिरी सीझन २’ मध्ये काम केले होते. तसेच त्याने एमटीव्ही ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘क्राइम पेट्रोल’सारखे शो केले होते.

Story img Loader