अनेक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता परम सिंहने प्रत्येकाच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्ही व्यतिरिक्त, त्याने ओटीटी आणि नाटकातही काम करत आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. पण सुरुवातीच्या काळात त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याने नुकतीच ‘न्यूज 18’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याला या क्षेत्रात काम करताना आलेल्या अनेक अनुभवांबद्दल भाष्य केलं. हे सगळं सांगत असताना त्याला कास्टिंग काऊचचाही अनुभव आला असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला. एका दिग्दर्शकाने त्याच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “काका, तुम्ही खूप काही दिलंत…”; विक्रम गोखले यांच्या आठवणीत श्रेया बुगडे भावूक

त्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं, ” अनेक कलाकारांना आतापर्यंत कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे आणि त्याबद्दल त्यांनी भाष्यही केलं आहे. तुझ्या बाबतीत असं कधी काही घडलं होतं का?” या प्रश्नाचं उत्तर देताना परम म्हणाला, “हो. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. मी नाव घेऊ शकत नाही पण मी एकदा कास्टिंग डायरेक्टरला भेटायला गेलो होतो आणि त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा : क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

पुढे परमने सांगितलं, “मी त्याला दूर ढकलले आणि त्याला एक ठोसा मारण्याचा प्रयत्न केला पण तो घाबरला आणि मग मी निघालो. मला स्वतःला कसं सांभाळायचं हे माहित आहे आणि कुठेतरी मला त्या लोकांबद्दल वाईट वाटतं ज्यांना अशा गोष्टींमधून जावं लागतं आहे. यावर आपण कठोर पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं. कोणाच्याही कामातून चांगलं काही मिळवायचं असेल तर व्यक्तीला फक्त त्याची कला आणि कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया थोडी संथ आहे परंतु फायदेशीर आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor param singh opens up about his casting couch experience rnv