छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं शुक्रवारी (११ नोव्हेंबर) निधन झालं. व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धांतने ४६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर पत्नी अलिशिया राऊत हिने पहिल्यांदाच सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिशियाने सिद्धांतबरोबरचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने सिद्धांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्यावरच प्रेम करत राहीन. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी क्लिक केलेला हा आपला पहिला फोटो. या दिवसानंतर मी कायम हसावं, खूश राहावं, वेगळ्या गोष्टी कराव्यात, क्षमतेपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करावा, असं तुला वाटतं होतं. वेळेवर जेवण्यासाठी तू मला कायमच आठवण करुन द्यायचा. कायम माझी साथ देणारा आणि माझ्यासाठी उभा राहणारा तू एकटाच होतास”, असं अलिशियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा >> Photos: सिद्धांत वीर सूर्यवंशी होता कोट्यवधींचा मालक, कुटुंबियांसाठी सोडून गेला ‘इतकी’ संपत्ती

पुढे अलिशियाने “तुझ्याबरोबर असताना मी कायमच छोटं बाळ व्हायचे. तुझं लक्ष कायम माझ्याकडे राहावं, असं मला वाटायचं. तुझं हसणं, तुझं प्रेम मी, मार्क आणि डिझाबरोबरच इतरांच्याही कायम लक्षात राहिल. प्रेम करणारा मुलगा, भाऊ, मित्र, पती आणि मुलांचा बाबा. तू मला योग्य निर्णय घेण्यास मदत करशील, हा मला विश्वास आहे. खऱ्या प्रेमाचा अर्थ मला तुझ्यामुळे समजला. खूप सारं प्रेम”.

हेही पाहा >> पहिल्या पत्नीला घटस्फोट, सह कलाकारासह अफेअर अन् रशियन मॉडेलसह थाटला होता नव्याने संसार; वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता सिद्धांत सूर्यवंशी

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सिद्धांतने ‘कुसूम’, ‘वारिस’, ‘सूर्यपूत्र कर्ण’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘कयामत’, ‘विरुद्ध’ या मालिकांमध्येही त्याने काम केलं होतं. जिद्दी दिल माने ना या मालिकेत सिद्धांत शेवटचा झळकला होता. सिद्धांत आणि अलिशिया २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor siddhaanth vir surryavanshi wife alesia raut shared emotional post after his death kak