गुल्की जोशी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती ‘मॅडम सर’ या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ३४ वर्षीय गुल्कीचं अजुन लग्न झालेलं नाही, पण तिने तिच्या लव्ह लाइफबद्दल खुलासा केला आहे. गुल्कीला डेटिंग अ‍ॅपवर जोडीदार सापडला आहे, तिनेच याबाबत माहिती दिली आहे.

टीव्ही मालिकांचे शूटिंग १२-१५ तास सुरू असते, त्यामुळे बरेच कलाकार त्यांचा जास्तीत जास्त वेळ सेटवर घालवतात. त्यांना वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. ‘मॅडम सर’मध्ये हसिना मलिकची भूमिका साकारणारी गुल्की जोशी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली आहे. ही मालिका संपल्यावर गुल्कीने काही काल ब्रेक घेतला होता. या ब्रेकमध्येच तिला तिच्या आयुष्यातील प्रेम मिळालं.

Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

Video: “त्याला गेम नाही, पण माणसं कळली,” सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…”

‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना गुल्की म्हणाली, “या ब्रेकमध्ये मला लोकांना भेटण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आणि मला प्रेमही मिळालं. मी कुणाला तरी डेट करत आहे आणि ती व्यक्ती इंडस्ट्रीतील नाहीये. मी त्या व्यक्तीबद्दल जाहीरपणे सांगण्यात अजून तयार नाही, कारण आमचं नातं नवीन आहे. तसेच लोकांची दृष्टही लागते.”

अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी बांधली लग्नगाठ; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले लाडक्या लेकीचे Photos

“काही लोकांनी मला डेटिंग अॅपविरोधात सल्ले दिले होते, पण तरीही मी डेटिंग ॲपवर आले. मला वाटलं काही वाईट अनुभव आला तर मी बोलेन की प्रोफाईल फेक आहे. माझ्याकडे फार वेळ आहे. पण सुदैवाने मला तिथे एकजण भेटला जो टीव्ही फॉलो करत नाही, त्याला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी त्याला माझ्या शोचे काही एपिसोड दाखवले, त्यानंतर त्याला खरं वाटलं की मी अभिनेत्री आहे. त्याआधी मी अतिशयोक्ती करत असल्याचं त्याला वाटलं होतं. याच गोष्टीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले असं मला वाटतं. त्याला मी एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आवडले. आता जवळपास नऊ महिने झाले आहेत. पहिल्यांदाच मला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटत आहे. मुलींसाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असते,” असं गुल्की जोशी म्हणाली.

gulki joshi
अभिनेत्री गुल्की जोशी (फोटो- इन्स्टाग्राम)

अजय देवगण-तब्बूचा ‘औरों में कहाँ दम था’ बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप; १०० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…

गुल्की जोशी हिने ‘फिर सुबह होगी’, ‘नादान परिंदे घर आजा’, ‘पिया रंगरेझ’, ‘परमअवतार श्री कृष्ण’, ‘एक शृंगार – स्वाभिमान’, ‘आणि पिया अलबेला’ या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. ‘मॅडम सर’ या मालिकेनंतर तिने ब्रेक घेतला व ती फिरायला गेली होती, असंही गुल्कीने सांगितलं.

Story img Loader