गुल्की जोशी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती ‘मॅडम सर’ या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ३४ वर्षीय गुल्कीचं अजुन लग्न झालेलं नाही, पण तिने तिच्या लव्ह लाइफबद्दल खुलासा केला आहे. गुल्कीला डेटिंग अॅपवर जोडीदार सापडला आहे, तिनेच याबाबत माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टीव्ही मालिकांचे शूटिंग १२-१५ तास सुरू असते, त्यामुळे बरेच कलाकार त्यांचा जास्तीत जास्त वेळ सेटवर घालवतात. त्यांना वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. ‘मॅडम सर’मध्ये हसिना मलिकची भूमिका साकारणारी गुल्की जोशी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली आहे. ही मालिका संपल्यावर गुल्कीने काही काल ब्रेक घेतला होता. या ब्रेकमध्येच तिला तिच्या आयुष्यातील प्रेम मिळालं.
‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना गुल्की म्हणाली, “या ब्रेकमध्ये मला लोकांना भेटण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आणि मला प्रेमही मिळालं. मी कुणाला तरी डेट करत आहे आणि ती व्यक्ती इंडस्ट्रीतील नाहीये. मी त्या व्यक्तीबद्दल जाहीरपणे सांगण्यात अजून तयार नाही, कारण आमचं नातं नवीन आहे. तसेच लोकांची दृष्टही लागते.”
“काही लोकांनी मला डेटिंग अॅपविरोधात सल्ले दिले होते, पण तरीही मी डेटिंग ॲपवर आले. मला वाटलं काही वाईट अनुभव आला तर मी बोलेन की प्रोफाईल फेक आहे. माझ्याकडे फार वेळ आहे. पण सुदैवाने मला तिथे एकजण भेटला जो टीव्ही फॉलो करत नाही, त्याला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी त्याला माझ्या शोचे काही एपिसोड दाखवले, त्यानंतर त्याला खरं वाटलं की मी अभिनेत्री आहे. त्याआधी मी अतिशयोक्ती करत असल्याचं त्याला वाटलं होतं. याच गोष्टीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले असं मला वाटतं. त्याला मी एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आवडले. आता जवळपास नऊ महिने झाले आहेत. पहिल्यांदाच मला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटत आहे. मुलींसाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असते,” असं गुल्की जोशी म्हणाली.
अजय देवगण-तब्बूचा ‘औरों में कहाँ दम था’ बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप; १०० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…
गुल्की जोशी हिने ‘फिर सुबह होगी’, ‘नादान परिंदे घर आजा’, ‘पिया रंगरेझ’, ‘परमअवतार श्री कृष्ण’, ‘एक शृंगार – स्वाभिमान’, ‘आणि पिया अलबेला’ या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. ‘मॅडम सर’ या मालिकेनंतर तिने ब्रेक घेतला व ती फिरायला गेली होती, असंही गुल्कीने सांगितलं.