हॅशटॅग मी टू चळवळ, कास्टिंग काऊच हे शब्द कलाक्षेत्रामध्ये काही नवीन नाहीत. चित्रपटात काम मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो असं काही अभिनेत्रींनी बऱ्याचदा स्पष्टपणे सांगितलं आहे. कंगना रनौत, विद्या बालन यांसारख्या अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. बॉलिवूडप्रमाणे छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनादेखील याचा सामना करावा लागत आहे. टीव्ही अभिनेत्री कौशिकी राठोडबरोबर असाच प्रकार घडला आहे.
‘कृष्णा चली लंडन’, ‘गुडिया हमारी सबी पे भारी’ फेम कौशिकी राठोड लवकरच ‘दुर्गा और चारू’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. करियरच्या सुरवातीच्या काळात दिग्दर्शकांनी तिच्याकडे विचित्र मागण्या केल्या होत्या. ती असं म्हणाली, “आता इंडस्ट्री खूप बदलली आहे. पण एकच गोष्ट आहे जी आजपर्यंत बदललेली नाही ती म्हणजे ते म्हणजे कामाच्या बदल्यात तुमच्याकडे फेवर मागतात.”
ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली तेव्हा मला दक्षिणेत एक प्रोजेक्ट मिळाला. सर्व काही पक्के झाले होते, पण जेव्हा मला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले ज्यात काही काही गोष्टींमध्ये तडजोड करण्यास सांगितले होते. मी अशा गोष्टींबद्दल फक्त ऐकले होते, पण जेव्हा माझ्यासोबत ही गोष्ट घडली तेव्हा मी पूर्णपणे हादरले. मी ऑफर नाकारली पण त्यांनी मला जे सांगितले त्यामुळे माझे मानसिक आरोग्य बिघडले होते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली. कौशिकी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.