‘सेक्स’ हा विषय अजूनही आपल्या देशात चार चौघांत चर्चा करण्यासारखा मानला जात नाही. ‘सेक्स’ हा शब्दसुद्धा कानावर पडला तर कित्येक लोक आपली नाकं मुरडतात. बरेच सेलिब्रिटीजसुद्धा या विषयावर उघडपणे बोलायचं टाळतात. पण एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याच्या नुकत्याच एका जाहिरातीमुळे या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. तो बॉलिवूड अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. लैंगिक आरोग्यासंबंधी एक मजेशीर पण एक संदेश देणारी जाहिरात रणवीरने केली आहे ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जाहिरातीमध्ये रणवीरसह प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सीन्सदेखील पाहायला मिळत आहे. यामध्ये एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये बरेच डबल मिनिंग संवाद आपल्याला ऐकायला मिळतात ज्यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं की पुरुषांच्या सेक्स प्रॉब्लेमबद्दल यात भाष्य करण्यात आलं आहे.

Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
lakshmichya pavalani new promo
Video : अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार! पाहा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा नवा प्रोमो
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Mayuri Deshmukh
“तर ते अत्यंत धोकादायक…”, लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाच्या वापराबाबत म्हणाली…

आणखी वाचा : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसह आमिरचा मुलगा जुनैद खान करणार रोमान्स; चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज

सोशल मीडियावर एकीकडे बऱ्याच लोकांनी रणवीर सिंगच्या या जाहिरातीचं कौतुक केलं आहे तर काहींनी या गोष्टीवर टीकाही केली आहे. आता प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाई हिनेदेखील रणवीर सिंगच्या या जाहिरातीवर टीका केली आहे. या जाहिरातीमधून भारतीय मालिकाविश्वाचे हास्यास्पद चित्रीकरण केल्याचा आरोप तिने लावला आहे. इतकंच नव्हे तर हा भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा अपमान असल्याचंही रश्मीचं म्हणणं आहे.

रश्मीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “मी प्रादेशिक टेलिव्हिजन मालिकांमधून माझ्या करिअरची सुरुवात केली. लोक याला छोटा पडदा म्हणतात जिथे सर्वसामान्य लोक बातम्या, क्रिकेटपासून बॉलिवूड चित्रपट अन् अशा बऱ्याच गोष्टी पाहतात. ही अनपेक्षित जाहिरात पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की हा टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा अपमान आहे. आम्हाला कायमच कमी लेखलं गेलं आहे. सगळ्यांनाच मोठ्या पडद्यावर झळकायची इच्छा आहे, प्रत्येकजण त्यासाठी झटतोय.”

rashmi-desai-post
फोटो : सोशल मीडिया

पुढे रश्मी म्हणाली, “पण मला माफ करा, टेलिव्हिजन शोदरम्यान अशा गोष्टी कधीच दाखवू नयेत. जी सत्य परिस्थिती आहे त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास माझी हरकत नाही पण ही जाहिरात म्हणजे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या तोंडात मारलेली एक जबरदस्त चपराक आहे. कदाचित माझी व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असेल, पण आपल्या मालिकांमध्ये आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. अन् या जाहिरातीमुळे मला खूप दुःख झालं आहे कारण या इंडस्ट्रीबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्या नेमक्या भावना समजतील अशी आशा आहे.”

काही नेटकऱ्यांनी रश्मीच्या या मताशी सहमती दर्शवली आहे तर काहींनी तिलादेखील खडेबोल सुनावले आहेत. ‘उतरन’ या मालिकेतून रश्मीला खरी ओळख मिळाली. कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली असून आज ती चाहत्यांच्या गळ्यातला ताईत झाली. रश्मीने अभिनेता नंदिश संधूसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव हे दोघं विभक्त झाले.

Story img Loader