टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये यश मिळवलं. विद्या बालन, सुशांत सिंह राजपूत, मृणाल ठाकूर, राधिका मदान, रिद्धी डोगरा अशी अनेक नावं या यादीत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे साक्षी तंवर. साक्षीने आपल्या अप्रतिम अभिनयाने मालिकेत संस्कारी सूनेचं पात्र साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. मग ती मोठ्या पडद्याकडे वळली. इथेही तिने २००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात अभिनय केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारी साक्षी अभिनयक्षेत्रात आली आणि तिने अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना या इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, साक्षी तंवरने नवी दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. प्री-युनिव्हर्सिटी कोर्स पूर्ण केल्यानंतर तिने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम केलं होतं. तिचा पहिला पगार ९०० रुपये होता आणि त्या पैशांतून साड्या घेतल्याचं साक्षीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती कॉलेजमध्ये त्या ड्रॅमॅटिक सोसायटीची सचिव आणि अध्यक्ष होती, तिने १९९८ मध्ये दूरदर्शनच्या ‘अलबेला सूर मेला’ साठी ऑडिशन दिली आणि प्रेझेंटर म्हणून तिची निवड झाली.

एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनली मराठमोळी अभिनेत्री, सहा महिन्यात झालेला घटस्फोट; तर दुसरं लग्नही मोडलं, तिचा पहिला पती…

या शोमधून लोकप्रियता मिळाल्यावर साक्षीला ‘कहानी घर घर की’ ही मालिका मिळाली. यात तिने पार्वतीची भूमिका केली होती. ही टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकेपैकी एक होती. या मालिकेमुळे साक्षी घरोघरी ओळखली जाऊ लागली. नंतर तिने अनेक मालिका केल्या. २०१३ मध्ये एकता कपूरचा शो ‘बडे अच्छे लगते है’ मध्ये साक्षी तंवरने मुख्य भूमिका केली होती. यात तिच्याबरोबर राम कपूर होता. राम व साक्षी यांनी या मालिकेत अनेक रोमँटिक सीन केले होते. त्यापैकी एक सीन १७ मिनिटांचा होता, यात दोघे एकमेकांना किस करतानाही दाखवण्यात आले होते. त्यांच्या या सीनची खूप चर्चा झाली होती.

‘F**k off’ म्हणत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाला सलमान खानने दिशा पाटनीसमोर दिलेला दम, नमाशी खुलासा करत म्हणाला…

साक्षीने ‘कॉफी हाऊस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर ती आतंकवादी अंकल, शोर से शुरूआत यांसारख्या चित्रपटात झळकली, पण तेही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण तिचा सर्वात मोठा बॉलीवूड सिनेमा आमिर खानबरोबर होता. दंगल हा बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, या चित्रपटाने जगभरात २००० कोटी रुपये कमावले होते, यात साक्षी आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…”

‘दंगल’ सुपरहिट ठरल्यानंतर साक्षीने अक्षय कुमारबरोबर ‘मोहल्ला अस्सी’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं. पण हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. मग ती वामिका गब्बीसह ओटीटी चित्रपट ‘माई’ मध्ये काम केलं. या चित्रपटातील साक्षीच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. साक्षी ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, ती एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये आहे. ५१ वर्षीय साक्षीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने लग्न केलेलं नाही, ती अविवाहित असून तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे, तिचं नाव दित्या तंवर आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress sakshi tanwar who worked in hotel then got hit serial played aamir khan wife in dangal ram kapoor kissing scene hrc