छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नुकतंच त्याचा अहवाल समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेला शिझान खान नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या

या संपूर्ण प्रकरणानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सध्या व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप याचा अहवाल समोर आलेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर काही गैरप्रकार घडला की नाही, याबद्दलची माहिती समोर येईल.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार, तुनिषा शर्माच्या शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. तिच्या शवविच्छेदनानंतरच्या प्राथमिक निष्कर्षानुसार तिचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळेच झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  
आणखी वाचा : बॉयफ्रेंडची मेकअप रुम, आत्महत्या अन् धावपळ; तुनिषाच्या आत्महत्येनंतर पोलीस शोधत आहेत ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं

तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालाकडे पोलिसांसह इतर सर्वजणांचेही लक्ष लागले आहे. यात ती डिप्रेशनमध्ये होती की नाही, त्यामुळे तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले का? ती गरोदर होती का? याबद्दलची माहिती उघड होणार आहे. तुनिषाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक गुपिते उघड होऊ शकतात, असा दावा केला जात आहे.

दरम्यान मीरा रोड येथे राहणार्‍या तुनिषाचे अभिनेता मोहम्मद शिझान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress tunisha sharma committed suicide know exactly caused the death reason reveled nrp