उर्वशी ढोलकीया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या कोमोलिका या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली. आजवर अनेक मालिकांमधून उर्वशीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. उर्वशी अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने मोनोकिनीतील काही हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने प्रिंटेड मोनोकिनी परिधान केली आहे. समुद्रात होडीवर उर्वशीने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

हेही वाचा>> “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

उर्वशीने शेअर केलेल्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. “तुला वॅक्सिंग करण्याची गरज आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “काही दिवसांत तुला सून येईल. मुलासमोर असे कपडे घालणं, चांगलं वाटतं का?” असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने “तू मलायका अरोरा नाही आहेस. क्षितीजची आई आहेस तू”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? अनन्या पांडेचे काका आणि सलमानच्या भावाचं नातं काय?

उर्वशी सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. थायलंड ट्रिपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. “लोक मला वाइल्ड म्हणतात….आणि हे मला मान्य आहे”, असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress urvashi dholkia troll for sharing hot monokini photos kak