Sarabhai vs Sarabhai Actress Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं अपघाती निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३९ वर्षांची होती. वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

वैभवीच्या निधनावर कलाविश्वातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवणनेही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “मला धक्का बसला आहे. मी सुन्न झालो आहे. ओम शांती” असं म्हणत सुमितने हळहळ व्यक्त केली आहे. वैभवी व सुमित राघवने ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत एकत्र काम केलं होतं.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
Four young laborers died when iron plate fell on them in Tunki Shivara on January 27
लोखंडी प्लेटा अंगावर पडून चौघांचा मृत्यू
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
GBS , Victim of GBS disease, Solapur, GBS disease ,
सोलापुरात जीबीएस आजाराचा संशयित मृत्यू

हेही वाचा >> ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू

माहितीनुसार, वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. या भीषण अपघातात वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैभवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका पदुकोणसह स्क्रीन शेअर केली होती.

Story img Loader