मालिकाविश्वात लगीनघाई सुरू आहे. मागील काही दिवसांत अनेक मराठी व हिंदी कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत, तर काहींनी प्रेमाची कबुली दिली. आता २४ वर्षीय अभिनेत्याने एक फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हा अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
टीव्ही मालिका ‘बालवीर’ मधून लोकप्रिय झालेला अभिनेता देव जोशीने (Dev Joshi Engagement) साखरपुडा केला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड आरतीबरोबर एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आह. देवने आधी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो व आरती एकमेकांचे हात पकडताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये देव व आरती एका मंदिरासमोर उभे असलेले पाहायला मिळतात.
देवने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओत गणरायाच्या मूर्तीसमोर देव व आरती एकमेकांचे हात हातात घेताना दिसतात. And we decided on forever! Here’s to a lifetime of love, laughter, and countless beautiful memories together. असं कॅप्शन देवने व्हिडीओला दिलं आणि हॅशटॅगमध्ये त्याने साखरपुडा केल्याचं सांगितलं.
पाहा व्हिडीओ –
दुसऱ्या फोटोत देव व आरती नेपाळमधील कामाख्या मंदिरात दिसत आहेत. दोघांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ व कपाळावर टिळा पाहायला मिळत आहे. मंदिरातील हा फोटो शेअर करून आयुष्यभर प्रेमाने एकत्र राहायचं ठरवलंय, अशा आशयाचं कॅप्शन देवने दिलं आहे.
देवने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते तसेच मालिकाविश्वातील त्याचे सहकलाकार कमेंट्स करून त्याला शुभेच्छा देत आहेत. आश्का गोराडिया, खुशी भारद्वाज, अनिरुद्ध दवे, पवित्रा पुनिया, चारू मलिक यांनी देव व आरतीचं अभिनंदन केलं आहे.
देव जोशीने बाल कलाकार म्हणून ‘महिमा शनि देव की’ मधून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. मग त्याने ‘काशी- अब ना रहे तेरा कागज कोरा’ मध्ये लहान शौर्याची भूमिका साकारली होती. मात्र ‘बालवीर’ आणि त्याचा दुसरा भाग ‘बालवीर रिटर्न्स’ मध्ये मुख्य भूमिका साकारून देव खूप लोकप्रिय झाला. त्याने चंद्रशेखर आझाद यांची बालपणीची भूमिकाही साकारली होती.