बॉलिवूडप्रमाणे अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा काही कलाकार त्यांच्या आयुष्यातील खासगी गोष्टी शेअर करताना दिसतात. अशाच प्रकारे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची एक खासगी गोष्ट उघड झाली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनेच याबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरांबा या मालिकेत आनंद मुकादम ही भूमिका साकारणारा अभिनेता विपुल साळुंखे हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असतो. मात्र नुकतंच त्याची पत्नी नम्रता साळुंखे हिने त्याच्या आयुष्यातील एका खासगी गोष्टीचा खुलासा केला आहे. यावर विपुलनेही प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांनंतर मला तुरुंगात टाकले तेव्हा…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नम्रताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या पतीला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. नम्रताने लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटले की, “एखादी गोष्ट मनात ठरवली तर त्यासाठी कसे मन लावून प्रयत्न करावे हे माझ्या नवऱ्याकडून शिकावे. गेले काही महिने तो हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी त्याने एक नवीन उपक्रम चालू केला आहे.

रिअल इस्टेट, लोन्स, क्रेडिट कार्ड यासाठी कुणाचेही फोन आले तर तो कमीत कमी २ ते ३ मिनिटं तरी अस्खलित हिंदी भाषेतून त्यांच्याशी जबरदस्ती… माफ करा, जबरदस्त संभाषण करून भाषेचा सराव करतो. माझा नवरा माझा अभिमान,असे नम्रताने ही पोस्ट शेअर करताना म्हटले. पत्नीची ही पोस्ट पाहिल्यानंतर विपुलनेही त्यावर कमेंट केली आहे. “हे असं नवऱ्याचं ट्रेड सिक्रेट रिव्हिल नसतं करायचं बायको… पाप लागतं….!!” विपुलने यासर्व चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

आणखी वाचा : Video : “मी तुम्हाला ओळखत नाही…” विमानात महिला प्रवाशाचे बोलणं ऐकताच आशिष विद्यार्थी चक्रावले; वाचा पुढे काय घडलं?

“बर्याच जणांना वाटत असेल किं मी फेसबुकवर लिहीत असलेली #एकबारीकप्रेमकथा ही सिरीज काल्पनिक असावी पण…ती सत्यघटनांवर आधारित असुन त्याचा वास्तविक जीवनाशी पुरेपूर संबंध आहे… ह्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे बायकोने मध्यंतरी फेसबुकवर टाकलेली माझ्या हिंदी भाषेवर भाष्य करणारी ही सार्कास्टिक पोस्ट…!!!” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

दरम्यान नम्रता आणि विपुलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. सध्या विपुल आणि स्मिता शेवाळे यांची मुरांबा मालिकेतील जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यापूर्वी विपुलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही काम केलं आहे. तसेच पावसा आणि रंग तुझा या गाण्यातही विपुल दिसला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv serial muramba fame actor vipul salunkhe wife share husband secret nrp