काही मालिकांचे कथानक प्रेक्षकांना भावून जाते. अशा मालिकांपैकी एक ‘इंद्रायणी'(Indrayani) ही मालिका असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत इंद्रायणी तिच्या गोड स्वभावाने सर्वांचे मन जिंकत असल्याचे दिसते. ज्यांना मदतीची गरज असते, त्यांना मदत करते. याबरोबरच, तिचे कीर्तन गाजत असल्याचे दिसत आहे. आता मालिकेत ट्विस्ट आला असून इंद्रायणीच्या काका-काकूची मालिकेत एन्ट्री झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदूच्या काका-काकूची होणार एन्ट्री?

कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्रायणी मालिकेत सध्या बाल कीर्तनकार इंदूचे कीर्तन गावागावांत गाजते आहे. इंदूला बऱ्यापैकी नावलौकिकदेखील मिळत आहे. आनंदीबाई इंदूला त्यांना हवं तसं वागविण्यात यशस्वी होत आहेत. पण, व्यंकू महाराजांची साथ असल्याने आनंदीबाईंच्या मार्गात अजूनही अडथळा आहे. आनंदीबाईंचा लोभ दिवसेंदिवस वाढतच आहे. व्यंकू महाराजांनी कानउघाडणी करूनदेखील आनंदीबाईंच्या वर्तनात काहीच बदल दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यात मालिकेत इंदूच्या काका-काकूंची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या येण्याने आनंदीबाई नाखूश आहेत.

काका-काकूंच्या येण्याने इंदूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंदू त्यांची ओळख तिच्या फँट्या गॅंगशी करून देते, त्यांना घरं दाखवते. पण, एकीकडे विठूच्या वाडीतील लोकांना त्यांच्यावर संशय येतो आहे, तर दुसरीकडे काका-काकूंना अपत्य नसल्याने त्यांनी इंदूला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्यंकू महाराज आणि इंदूचं नातं रक्ताचं नसलं तरीदेखील त्यांचं नातं बाप-लेकीसारखं आहे. आता काका-काकूंच्या रूपात इंदूला तिच्या हक्काचे आई-वडील मिळणार की गावच्या लोकांचा संशय खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘इंद्रायणी’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची क्षमता विठुरायाने इंदूकडे दिली आहे. आजवर इंदूचे स्वतःचे असे म्हणण्यासारखे रक्ताच्या नात्यातील कोणीच नव्हते, जे तिच्या बाजूने लढतील, तिला तिचा हक्क मिळवून देतील. आता काका-काकूच्या येण्याने तिच्या दुःखात, तिच्या सुखात सहभागी होणारी हक्काची माणसं खरंच तिला मिळणार का? पण, आता काका-काकूंच्या येण्याने आनंदीबाईंच्या स्वार्थात आणि पैसे कमावण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आता आनंदीबाई या सगळ्याला कशी सामोरी जाणार, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.