अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांनी २३ जुलै रोजी साखरपुडा केला. स्वानंदी ही ज्येष्ठ मराठी अभिनेते उदय टिकेकर व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची कन्या आहे. स्वानंदी व आशिषच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. तिच्या लग्नाबाबत तसेच होणारा जावई आशिषबद्दल तिचे वडील उदय टिकेकर यांनी भाष्य केलं आहे.

स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार? उदय टिकेकरांनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांचे लग्न…”

d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

स्वानंदीने आशिष आवडतो असं सांगितल्यावर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढली का? असा प्रश्न विचारल्यावर उदय टिकेकर म्हणाले, “मी, स्वानंदी आणि आरती आमच्यात कोणत्याही गोष्टी लपलेल्या नसतात. त्यामुळे माहिती काढायची किंवा काय चाललंय, कसं चाललंय अशी शेरलॉक होम्सगिरी करायची काही गरज नव्हती. मला स्वतःला आशिष कुलकर्णी माहीत नव्हता. त्यामुळे मी आरती, आरतीची आई आम्ही एका रात्रीत त्याची ‘इंडियन आयडॉल’मधील सर्व गाणी ऐकली. नंतर वाटलं की वाह! काय गातो हा पोरगा.”

“स्वानंदी-आशिषचं लग्न ग्रँड होणार नाही, कारण…”, उदय टिकेकरांनी सांगितला लेकीच्या लग्नाचा प्लॅन; म्हणाले, “मला अनेकजण शिव्या…”

पुढे उदय टिकेकर यांनी मित्र व नातेवाईकांच्या प्रतिक्रिया सांगितल्या. “जेव्हा मी त्याच्याबद्दल माझ्या मित्रांना सांगितलं तेव्हा ते सगळे आशिषचे चाहते निघाले. मदन कुलकर्णी नावाचा माझा साढू आहे. तो कर्नाटकमध्ये राहतो. त्याला कळाल्यावर तो स्वानंदीला म्हणाला ‘मी तुझ्या पार्टीत नाही. मी कुलकर्णी आहे, लग्नात मी मुलाकडून असेन’. असे मला कितीतरी लोक भेटलेत जे पहिल्या एपिसोडपासून त्याला फॉलो करतात, त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण नंतर कळतात,” असं उदय टिकेकर लोकमतशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, स्वानंदी ही उदय टिकेकर व आरती अंकलीकर-टिकेकर यांची एकुलती एक मुलगी आहे. तिने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेमध्ये काम केलंय.

Story img Loader