झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी नारायण राणे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.

नेमकं काय नारायण राणे?

“मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं. पण, दोनदा बाळासाहेब ठाकरेंना तयार करून मी उद्धव ठाकरेंना आणलं. बाळासाहेब ठाकरेंना एकच धमकी असायची, घर सोडण्याची,” असं नारायण राणेंनी सांगितलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात संजय राऊत म्हणतात की, ‘नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. आता फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे, की बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून मी नेमलं.’

“हे माझं पाप आहे”

यावर नारायण राणे म्हणाले की, “याला खासदार मी केलं, नाहीतर झालाच नसता. तेव्हा खासदार झाला नसता, तर पुढे कधीच खासदार होत नाही. हे माझं पाप आहे.”

“…तर लिहायचे माझा शिवसैनिक नारायण राणे”

बाळासाहेब ठाकरेंनी बोलवून कधी पाठीवर थाप दिली का? असा प्रश्न सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी विचारल्यावर राणेंनी सांगितलं की, “बाळासाहेबांकडे कोणतेही नवीन पुस्तक आलं आणि मला द्यायचं झालं तर, लिहायचे माझा शिवसैनिक नारायण राणे. माझा शिवसैनिक म्हणायचे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र दिलं नाही.”

“एक आमदार एकडचा-तिकडे…”

“ही परिस्थिती यांनीच आणली, आम्ही सर्व पक्षातून जायला. मी शिवसेनेत असतो, तर ही अवस्था झाली नसती. एक आमदार इकडचा-तिकडे जाऊ शकत नव्हता, चाळीस तर सोडाच,” असेही नारायण राणे म्हणाले.

Story img Loader