Ude Ga Ambe New Marathi Serial : ‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांच्या यशानंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका याचं नाव आहे ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी पूजनीय आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं रक्षण करते. आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व व इतिहास मांडण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होईल. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार आहे. ‘देवयानी’ या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘देवयानी’नंतर तो पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’बरोबर ( Ude Ga Ambe ) जोडला जाणार आहे.

हेही वाचा : मोठा ट्विस्ट! व्होटिंग लाइन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

देवदत्त नागेबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे झळकणार आहे. यापूर्वी तिने ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकेत काम केलं होतं. याशिवाय ‘तेरी लाडली मैं’ या हिंदी मालिकेत सुद्धा अभिनेत्री झळकली होती.

Ude Ga Ambe New Marathi Serial ‘उदे गं अंबे – कथा साडेतीन शक्तीपीठांची’

नव्या मालिकेविषयी काय म्हणाला देवदत्त?

‘उदे गं अंबे – कथा साडेतीन शक्तीपीठांची’ ( Ude Ga Ambe ) या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाला, “टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखील पोहोचता. ‘स्टार प्रवाह’च्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास १० वर्षांनंतर मी पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’बरोबर काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असेल. महादेवांपुढे श्रद्धेने लीन होऊन या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतोय. प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही मिळावं हीच अपेक्षा आहे.”

हेही वाचा : कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”

‘उदे गं अंबे- कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ( Ude Ga Ambe ) ही नवीन मालिका लवकरच फक्त ‘स्टार प्रवाहवर’ प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ude ga ambe star pravah new marathi serial promo out now devdatta nage in lead sva 00