सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वांकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री यंदा न्यूझीलंडमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहे. तिने बाप्पासाठी ठेवलेल्या खास थीमचे फोटो शेअर केले आहेत.
‘स्वामिनी’, ‘अगंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री उमा हृषिकेश पेंढारकर ही सध्या टेलिव्हिजन विश्वापासून दूर आहे. ती सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. तिचा पती तिथे राहतो, त्यामुळे ती अभिनयातून ब्रेक घेऊन तिथे राहत आहेत. यंदाचा गणेशोत्सवही ती तिकडेच साजरा करणार आहे.
उमाने यंदा बाप्पासाठी खास वारली थीम ठेवली आहे. त्यासाठी तिने दोन दिवस जागून पेंटिंग पूर्ण केली. ती पूर्ण झाल्याची माहिती तिने फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर दिली आहे. “तयारी बाप्पांच्या आगमनाची. यंदा थीम म्हणून वारली पेंटींग करायचं ठरवलं. सलग २ दिवस जागून अखेर आज पूर्ण झालेलं हे डेकोरेशन”, असं तिने फोटोंना कॅप्शन दिलं आहे. यामध्ये एक फोटो पेंटिगबरोबर तिचा आहे, तर दुसऱ्या फोटोत फक्त पेंटिंग दिसत आहे.
दरम्यान, अभिनेत्री असण्याबरोबरच उमा समुपदेशकही आहे. तिने काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं आहे. न्यूझीलंडमध्ये गेल्यावर तिने मोफत ऑनलाईन काउन्सिलिंग सुरू केल्याची माहिती दिली होती. कुणाला व्यक्त व्हायचं असेल तर मला इन्स्टाग्रामवर मेसेज करून सगळं सांगू शकता, असं आवाहन तिने केलं होतं.