देशभरात सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु, सध्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या स्वरूपात आधीपेक्षा बदल झाल्याचं मत एका मराठी दिग्दर्शकाने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उंच माझा झोका’ या मालिकेद्वारे घराघरांत लोकप्रिय झालेले दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात शेअर केलेली फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “ही साधी गोष्ट कधी कळणार?” नाट्यगृहातील अस्वच्छता पाहून प्रिया बापटचा संताप, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

विरेंद्र प्रधान यांची पोस्ट

सुंदर प्रसन्न असे रामराज्य आणि त्यात आज प्रजासत्ताक दिनाची छान पहाट. ही एक नवी संस्कृती जी आपल्याकडे रुजायला लागली आहे त्याने डोळे भरून आलेत. कान तृप्त झालेत. प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे, जोरजोरात डीजे लागले आहेत. बायका आणि पुरुष जोरजोरात इंग्रजी मध्ये भाषण करत आहेत. जोरजोरात इंग्रजी-हिंदी गाण्यांची मैफील जमली आहे. त्यावर काही बायका चमच्यात लिंबू ठेऊन धावत आहेत. लहान मुले आपल्या आयांना धावताना पाहून चित्कार करत आहेत. इंग्रजी आणि हिंदीचा सुरेल मिलाफ आणि त्यावर डीजेचा तडका, त्यात आपल्या रामराज्यात सुरेल प्रजासत्ताक पहाट, तोंडात चमचा लिंबू, पायात रश्या बांधून धावणे, समोसा ढोकळ्यावर आडवा हात असे हे बहारदार इंग्रजी राज्याच्या सीमा रेषेवर पोहोचलेली आपली स्वतःची, उदयास येत चाललेली संस्कृती पाहून डोळ्यांत पाणी उभे राहीले आहे. तुम्ही म्हणाल डोळ्यात पाणी उभे कसे राहीले? तर… हा एक कोणीतरी असाच बाजूला उभा आहे. शांत. समृद्ध. अमर्याद अस्तित्व असलेला. दुर्लक्षित वगैरे अजिबात नाही हा. देशात, रामराज्यात याचा सन्मान, वंदन आणि अभिमान, प्रेम खऱ्या अर्थी दर्शवणारे करोडो आहेत. म्हणून तो अजून डौलात उभा आहे. हवेच्या लहरींवर फडफडतो आहे. पण मग ही कोण माणसे आहेत? रामराज्यातल्या मुलांना किती सुंदर भवितव्य देतायत. मन भरुन आले हो
प्रजासत्ताक दिनाच्या खुप शुभेच्छा

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : सायली-अर्जुनची माथेरान सफर! मालिकेत प्रियामुळे येणार मोठा ट्विस्ट, सेटवरचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर

विरेंद्र प्रधान यांची पोस्ट

दरम्यान, विरेंद्र प्रधान यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत दिग्दर्शकाच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन विरेंद्र प्रधान यांनी केलं आहे. सध्या त्यांची ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विरेंद्र प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील अनेक अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unch majha zoka fame marathi director virendra pradhan shares post on republic day sva 00