‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन विरेंद्र प्रधान यांनी केलं आहे. सध्या त्यांची ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विरेंद्र प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील अनेक अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या दिग्दर्शकाने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी त्यांच्या लेकाला शाळेत आलेला अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे.

विरेंद्र प्रधान यांची पोस्ट

नमस्कार. काल माझा मुलगा शाळेतून घरी आला तो अस्वस्थ होऊनच. आल्या आल्या त्याने मला त्याच्या टिचरने शिकवलेली एक गोष्ट सांगितली. ती सांगत असतानाही तो थरथरत होता. असो… यावर त्या संबंधित टिचरना मी हे एक पत्र लिहिले आहे. जे मुद्दाम इकडे पोस्ट करतोय. या अशा शाळेत आणि असा अभ्यासक्रम ( जो अजून बराच आहे ) असलेल्या शाळेत का पाठवता मग मुलाला, बदला शाळा असे अनेक उपाय मला यावरून सांगण्यात येतील हे नक्की. मला मुद्दाम हे सांगायचे आहे की भारतात आणि अनुषंगाने महाराष्ट्रात, कुठल्याही बोर्डचा हा काय अभ्यासक्रम आहे याबद्दल आणि त्यातून मुलांची होणारी जडण-घडण, याबद्दल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होतो का? तुम्हा कोणाला असे अनुभव आलेत का?

विरेंद्र प्रधान शिक्षकांना उद्देशून लिहितात, “मी तुमच्या शाळेतील विद्यार्थी रणवीर प्रधानचा पालक या नात्याने हे पत्र लिहित आहे. तो आता इयत्ता 7B मध्ये शिक्षण घेत आहे. काल, माझ्या मुलाने त्याला तुम्ही इंग्रजी साहित्याच्या तासिकेला सांगितलेली एक गोष्ट मला येऊन सांगितली. त्या गोष्टीतील १४ वर्षीय आफ्रिकन अमेरिकन मुलाचं नाव एमेट टिल असं होतं. या मुलाची त्याच्या चुलत भावडांकडून निर्घुण हत्या करण्यात आली. माझ्या मुलाने ही संपूर्ण कथा मला सांगितली तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. या संपूर्ण कथेचं सत्य मी गुगलवर शोधलं आणि ही कथा खरी होती. अशा स्वरुपाची कथा शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी का? कृष्णवर्णीय मुलांच्या आशावादी कथा किंवा कृष्णवर्णीय समुदायाचा सकारात्मक शेवट अशा स्वरुपाच्या कथा केव्हा शिकवल्या जातील? फक्त एक वडील म्हणून नव्हे तर बालमानसशास्त्र समजून घेणारा एक कलाकार म्हणून अशा निर्णायक वयात मुलांचं मत आणि स्वभाव यांचा विचार व्हावा असं मला वाटतं. अशा हिंसक घटनांचं कथन शाळेत करणं, कितीही वास्तविक असलं तरीही यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या कथा सांगण्यापूर्वी मुलांच्या वयाचा विचार केला जावा अशी माझी विनंती आहे. कृपया, सर्वात आधी बालमनाचा विचार केला जावा.”

हेही वाचा : १३ व्या वर्षी घरातून पळाले, मुंबईत येऊन बनले गुंड; रस्त्यावर भांडत होते अन्…, अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी

दरम्यान, दिग्दर्शकाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “खूप उत्तम पोस्ट”, “सध्याच्या मुलांचा शाळेचा अभ्यासक्रम हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.”, “सरकारने उपाय केले पाहिजेत.” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unch maza zoka director virendra pradhan shares his experience about son ranveer pradhan sva 00
Show comments