गेल्या काही दिवसांत ओटीटी माध्यमांमध्ये वाढ झाली असली तरी प्रेक्षकांमध्ये आजही छोट्या पडद्याची लोकप्रियता कायम आहे. आघाडीच्या मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. चित्रपट, नाटक, वेब सीरिज यांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरीही टेलिव्हिजन मालिकांची लोकप्रियता कमी झालेली नाही. कमी टीआरपीमुळे मालिका अचानक बंद केल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. याबाबत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा उल्लेख करत एक खोचक पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरेंद्र प्रधान यांनी छोट्या पडद्यावरील ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ या गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “…तर सलाम ठोकेन”, अजिंक्य देव यांनी नेटकऱ्यांना दिलं आव्हान; म्हणाले, “माझ्या हिंदी बोलण्याचा…”

विरेंद्र प्रधान यांची पोस्ट

माझ्या नवीन मालिका :

रणबीर कपूरने ‘अ‍ॅनिमल’च्या आधी खूप छान सिनेमे केले ते चालले नाहीत. फ्लॉप झाले..मग त्याने ‘अ‍ॅनिमल’ केला अन् सुपरहिट झाला. राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ केला. फ्लॉप झाला…मग त्याने बॉबी बनवला…सुपरहिट झाला. मी ‘उंच माझा झोका’, ‘स्वामिनी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘यशोदा’ या मालिका केल्या नाही चालल्या. (TRP रेसमध्ये) आता मी नवीन मालिका करतोय. काही टायटल्स रजिस्टर केली आहेत.

सून माझी Animal
सासू माझी Animal
सून सासूला चावते
रक्त पिपासू सासू
अजून काही छान नावे सुचली तर नक्की कळवा. TRP सॉलिड आणि भारताचं इकॉनॉमिक्स सुद्धा सुधारेल.

विरेन

हेही वाचा : “चांगले कपडे घ्यायची ऐपत…” बिग बींनी दिवाळखोरी जाहीर केल्यानंतरच्या काळाबद्दल अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला

विरेंद्र प्रधान

दरम्यान, विरेंद्र प्रधान यांच्या पोस्टवर सध्याची बदलती पिढी, मालिकांचे विषय, टीआरपी यांसंदर्भात नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unch maza zoka fame director virendra pradhan shares post on marathi serial trp sva 00
First published on: 26-12-2023 at 18:16 IST