काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. तर आता अनेक वर्षांनी या मालिकेच्या दिग्दर्शकांची आणि मालिकेतील काही कलाकारांची भेट झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘उंच माझा झोका’ या मालिकेचं दिग्दर्शन विरेन प्रधान यांनी केलं होतं. या मालिकेत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत अशी तगडी स्टारकास्ट होती. या मालिकेत रमाबाई रानडे यांची लहानपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने साकारली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचं भरभरून कौतुक मिळालं.

आणखी वाचा : “तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…

आता तेजश्री वालावलकर मोठी झाली आहे. ती कशी दिसते, ती काय करते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिची आणि या मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची भेट झाली. यानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा एक सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “उंच माझा झोका. छोटी रमा आता मोठी झाली. दिवस भरभर मोठे होतात.”

आणखी वाचा : “हे माझ्या घरच्यांनाही माहीत नाही….”, स्पृहा जोशीने उघड केलं तिच्याबद्दलचं एक मोठं गुपित

तर आता विरेन प्रधान यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत त्यांची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत. तर काही चाहत्यांनी कमेंट करत “ही किती वेगळी दिसते!”, “ही कितीही बदलली तरीही अजून तशीच क्युट आहे.” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncha maza zoka director virendra pradhan shared photo with tejashree walawalkar rnv