‘बिग बॉस ओटीटी’फेम उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी ही तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही सातत्याने चर्चेत आहे. तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे.
नुकतंच उर्फीने ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात उर्फीने बऱ्याच प्रश्नांची अगदी सडेतोड उत्तरं दीली. यादरम्यान एका प्रश्नाचं उर्फीने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये उर्फीने घरी नेमके कोणते कपडे परिधान करते याचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “माझं काम कपडे उतरवण्याचं…” मास्क मॅन राज कुंद्राचा खास स्टँड-अप कॉमेडी करतानाचा व्हिडीओ व्हायरल
जेव्हा मुखवटा उतरतो तेव्हा उर्फी जावेद नेमकी कशी असते, घरी कोणते कपडे परिधान करते? या प्रश्नाचं उत्तर देताना उर्फी म्हणाली, “मी घरात नग्नावस्थेत वावरते, मी ३ बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे त्यामुळे मी घरात कपडे न घालताच वावरते कारण ते मला फार आवडतं. आधी मी रूममेट्सबरोबर राहायची तेव्हा एका रूममध्ये ७ ते ८ मुली मिळून राहायच्या, पण आता मी एक आलीशान ३ बीएचके फ्लॅट घेतला आहे त्यामुळे मी नग्न अवस्थेतच घरात फिरते. फक्त बाहेरच नव्हे तर मी घरातही अशीच असते.”
यापुढे उर्फी जावेद टी-शर्ट किंवा पायजमा परिधान करते का? या प्रश्नाचं अत्यंत मजेशीर उत्तर उर्फीने दिलं. ती म्हणाली, “मी पायजमा वर परिधान करते व टी-शर्ट खाली परिधान करते.” उर्फीच्या या उत्तरावर सगळ्यांनाच हसू फुटलं. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.