मॉडेल उर्फी जावेद कायम आपल्या अतरंगी कपड्यांमुळे आणि विचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता तिला तोकडे कपडे घालणं आणि अशी फॅशन करणं महागात पडल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे पोलीस तिला अटक करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भर चौकात गोळ्या घालेन,” राजपाल यादवचा लूक क्रिएट केल्याने उर्फी जावेदला धमक्या; पोस्ट करत म्हणाली, “या देशातील…”

उर्फी जावेदला तोकडे कपडे घातल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदचा अटकेचा हा व्हिडीओ पापाराझी अकाउंट विरल भयानी व सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे, जिथे दोन महिला पोलीस येतात आणि तिला सोबत चल असं म्हणतात.

त्यावर उर्फी जावेद पोलिसांना त्यामागचं कारण विचारते. उत्तर देताना महिला पोलीस तिच्या तोकड्या व अतरंगी कपड्यांचा उल्लेख करतात. मग उर्फी म्हणते की ती तिला हवे तसे कपडे घालू शकते, पण पोलीस नकार देत तिला गाडीत बसवून नेतात. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

पापाराझी अकाउंटवरून उर्फीला खरंच अटक झाल्याचं म्हटलं गेलंय, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे उर्फीला खरंच तिच्या कपड्यांमुळे अटक झाली आहे की तो व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवला गेलाय, याबाबत अधिकृत माहिती नाही. पण नेटकरी मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हणत आहेत. पब्लिसिटीसाठी उर्फीनेच हा व्हिडीओ बनवला आहे, अशा कमेंट्स व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed arrested by police over controversial dresses video viral hrc