नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री-मॉडेल म्हणजे उर्फी जावेद. तिची हटके स्टाईल नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते कारण म्हणजे तिने खरेदी केलेली नवी कोरी आलिशान गाडी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. पण आता तिने एक गाडी खरेदी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. विशेष म्हणजे ही गाडी तिने स्वतःसाठी घेतली नसून तिच्या टीम आणि स्टाफसाठी खरेदी केली आहे.

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूने केली मानधनात मोठी वाढ, आता सोशल मीडियावर एका पोस्टसाठी आकारते ‘इतकी’ रक्कम

उर्फीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या नवीन गाडीवरून पडदा काढताना दिसत आहे. याचबरोबर उर्फीने गाडीच्या शोरूममध्येच केक कापत नवीन गाडी खरेदी केल्याचं सेलिब्रेशन केलं. तिने ऑडी किंवा बीएमडब्ल्यू नाही तर नवी कोरी SUV गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत २५ ते ३१ लाखांच्या दरम्यान आहे.

हेही वाचा : Video: धाकट्या बहिणीच्या स्टाईलपुढे उर्फी जावेद पडली फिकी, पार्टीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीनं ही गाडी तिच्यासाठी नाही तर तिच्या स्टाफ आणि टीमसाठी घेतली आहे. याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी शूटिंग आहे तिथे तिच्या टीमला रिक्षाने यावं लागतं. ही तिने तिच्या पहिल्या गाडीपेक्षा मोठी आहे. “या गाडीत माझा मॅनेजर, माझा मेकअप आर्टिस्ट, बाउंसरसोबत सगळे आरामात बसू शकतात,” असं उर्फी म्हणाली. त्यामुळे आता सर्वजण तिच्यावर अभिनंदन असा वर्षाव करत आहेत.