सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. चित्रविचित्र कपड्यांमुळे ओळखली जाणारी उर्फी सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीला Laryngitis (लॅरिन्जायटिस) हा आजार झाला आहे. उर्फीने स्वत:च या आजाराबद्दल माहिती दिली आहे. सध्या उर्फी या आजारावर दुबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये उर्फी तिच्या आजाराबाबतची माहिती चाहत्यांना देत होती. तेव्हा, डॉक्टरने तिला न बोलण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतने किरण मानेंबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी दुबईला व्हॅकेशन ट्रिपवर गेली होती. तेव्हाच तिला या आजाराचे निदान झाले. उर्फीला या आजारातून पूर्णपणे बरं व्हायला नेमका किती वेळ लागेल, याबाबत तिने कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा>> ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतन वडनेरेची नवी इनिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीसह पार पडला साखरपुडा

काय आहे Laryngitis (लॅरिन्जायटिस) आजार?

लॅरिन्जायटिस या आजारात घशाला सूज येते. त्यामुळे स्वरयंत्रणांना त्रास जाणवू लागतो. या आजारामुळे व्यक्तीला बोलण्यासही त्रास जाणवतो. हा आजार झालेल्या व्यक्तीचा आवाज बदलतो किंवा घोगरा होतो. घसा दुखणे, डोकेदुखी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed dignosed with laryngitis disease admitted in dubai hospital kak