उर्फी जावेद ही तिच्या हटके कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने केलेल्या अतरंगी स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिने नक्की काय परिधान केलं आहे, त्याला काय म्हणतात हे अनेकदा कोणालाच कळत नाही. पण आता नुकताच तिने तिच्या एका ड्रेसला नाव दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी एकही वस्तू नाही जिच्यापासून उर्फीने स्वतःचे कपडे तयार केले नाहीत. पिना असो, चार्जर असो, प्लास्टिकची पिशवी असो… विविध वस्तूंचा उपयोग ती तिचे कपडे तयार करण्यासाठी करते. तिच्याकडे बघून अनेकदा सर्वांना प्रश्न पडतो की, हिने जे कपडे परिधान केले आहेत त्याला नेमकं काय म्हणतात? आता तिला हा प्रश्न विचारला गेला असता तिने याचं उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : “मी सेमी प्रेग्नंट…” वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य

उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या तिने तिच्या नव्या ड्रेसला एक हटके नाव दिल्याचं दिसतंय. नुकतीच एका ठिकाणी उर्फी आणि पापाराझींची भेट झाली. यावेळी तिने एक शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला होता. तिच्या इतर कपड्यांप्रमाणे तिचा हा ड्रेस देखील तिने स्वतःच डिझाईन केला होता. तिला पाहताच एका मीडिया फोटोग्राफरने विचारलं की, “या ड्रेसचं नाव काय?” त्यावर उर्फी म्हणाली, “ड्रेसला काय नाव असतं! या ड्रेसचं नाव आहे शीला की जवानी.” तिच्या या उत्तराने तिथे उपस्थित सर्वच जण हैराण झाले.

हेही वाचा : “माझी मानसिक स्थिती…” सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे उर्फी जावेदला होतोय त्रास

उर्फीचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर त्याचबरोबर या ड्रेसमुळे आणि त्या ड्रेसला तिने दिलेल्या नावामुळे ती पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed named her dress shila ki jawani video viral rnv