सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. चित्र-विचित्र कपड्यांमधील फोटो उर्फी तिच्या सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते. कधी वायर तर कधी पोत्यापासून ड्रेस बनवून उर्फी फॅशन करत असते. आता उर्फीने चक्क कचऱ्याच्या पिशवीपासून उर्फीने ड्रेस बनवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिन बॅगपासून ड्रेस बनवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने “कचऱ्याच्या पिशवीपासून बनवलेला हा ड्रेस मी रेड कार्पेटवरही परिधान करू शकते”, असं म्हटलं आहे. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात असतानाही मी असा कचऱ्याच्या पिशवीपासून बनवलेला ड्रेस घातला होता, असंही ती म्हणाली आहे.

हेही वाचा>> ‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल

हेही वाचा>> अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टीचे डोळे पाणावले; लेक सप्तपदी घेताना भावूक झाला अभिनेता

उर्फीचा हा नवा ड्रेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. उर्फीची ही क्रिएटिव्हिटी पाहून चाहतेही आश्चर्यतकित झाल्याचं दिसत आहेत.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच दीपिका पदुकोणचं ‘बेशरम रंग’ गाण्याबाबत वक्तव्य, म्हणाली…

दरम्यान, उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. पोलिसांत तक्रार करुन उर्फीला थोबडवेन असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर उर्फीने याप्रकरणी जबाब नोंदवत चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत व महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed new video made dress from dustbin bag goes viral kak