‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी ही तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही सातत्याने चर्चेत आहे. ती लवकरच ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शो च्या आगामी पर्वात झळकणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र आता तिने यासाठी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. याचे कारणही समोर आलं आहे.

उर्फी जावेद ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या काही महिन्यांपासून उर्फी जावेद ही ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. येत्या पर्वासाठी तिला संपर्कही साधण्यात आला आहे. तसेच ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वाची टीम सातत्याने तिच्याबरोबरच चर्चा करत आहे, असेही बोललं जात होतं.
आणखी वाचा : Video : “मला माझे स्तन…” उर्फी जावेदचे अश्लील इशारे करत बोल्ड वक्तव्य

Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Chhagan Bhujbal
मंत्रिमंडळातून वगळण्यापूर्वी वरिष्ठांनी भुजबळांना दिलेली खास ऑफर; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी वरिष्ठांना नकार दिला”
Loksatta editorial PM Narendra Modi Addresses Lok Sabha in Constitution Debate issue
अग्रलेख: प्रहसनी पार्लमेंट
allu arjun arrested cm revanth reddy reaction
अल्लू अर्जुनच्या अटकेवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हस्तक्षेप करणार नाही…”

उर्फीनेही अनेकदा स्वत: हा शो करण्याची इच्छा दर्शवली होती. पण आता मात्र उर्फीने हा शो करण्यास नकार दिला आहे. उर्फी जावेद ही सध्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. खतरो के खिलाडी हा शो करण्यापूर्वी उर्फीच्या त्या प्रोजेक्टच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे तिला या शो मधून माघार घ्यावी लागली आहे.

आणखी वाचा : “एखाद्यासारखं सुंदर होण्यापेक्षा…” तेजश्री प्रधानच्या पोस्टने वेधलं लक्ष

उर्फी ही तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. ती लवकरच याबद्दलची अपडेट शेअर करणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी उर्फी ही एका दाक्षिणात्य मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. त्याबरोबरच प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला या जोडीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले होते.

Story img Loader