‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. यंदाच्या पर्वाच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये रॅपर एमसी स्टॅनने जागा मिळवली आहे. एमसी स्टॅन प्रसिद्ध रॅपर आहे. बिग बॉस हिंदी शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली आहे. टॉप ५ फायनलिस्टमध्ये स्थान मिळवल्याने बिग बॉसची ट्रॉफी त्याने नावावर करावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमसी स्टॅनचे चाहते त्याला समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनेही एमसी स्टॅनसाठी खास ट्वीट केलं आहे. उर्फीने या ट्वीटमधून एमसी स्टॅनला पाठिंबा दर्शविला आहे. “क्या रे शेंबडी, एमसी स्टॅनसाठी वोट केलं का?” असं ट्वीट उर्फीने केलं आहे. एमसी स्टॅनसाठी त्याच्याच स्टाइलमध्ये केलेल्या उर्फीच्या ट्वीटने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.उर्फीने या ट्वीटमधून एमसी स्टॅनला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे.

हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच कोर्टात पोहोचली राखी सावंत, म्हणाली “त्याला जामीन…”

हेही वाचा>> किरण मानेंना लॉटरी लागली! महेश मांजरेकरांबरोबर करत आहेत शूटिंग; सेटवरील फोटो शेअर करत म्हणाले…

अतरंगी कपड्यांमुळे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीने एमसी स्टॅनसाठी केलेलं ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटवर उर्फीसह एमसी स्टॅनच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये एमसी स्टॅनला वोट केल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: “बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्झ…” आदिलने वाचला राखी सावंतकडे असलेल्या गाड्यांचा पाढा, जुना व्हिडीओ व्हायरल

एमसी स्टॅनसह शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियंका चौधरी आणि शालिन भनौट हे ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचे फायनलिस्ट ठरले आहेत.१२ फेब्रुवारीला ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण नावावर करणार यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed tweet for bigg boss 16 fame rapper mc stan goes viral kak