सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा केला जातो. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन वीकची क्रेझ पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमविरांना ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याबाबत सल्ला दिला होता.
“१४ फेब्रुवारीला प्रेयसीऐवजी गायीला मिठी मारा” असा निर्देश काढण्यात आला होता. १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असं सांगण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलेल्या या सल्लाबाबत सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने ट्वीट केलं आहे. उर्फीने भाजपा नेत्याचा एक व्हिडीओ तिच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपा नेता गायीच्या जवळ जाताच तिने पाय मारल्याचं दिसत आहे. त्यानंतर गायीला हात लावल्यानंतर पुन्हा तिने पाय मारला आहे.
हेही वाचा>> Video: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासह अक्षय कुमारने केला भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
उर्फी जावेदने व्हिडीओ शेअर करत “#cowhugging” असं म्हटलं आहे. उर्फीने कॅप्शनमध्ये हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहेत. उर्फी जावेदचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. उर्फीविरोधात त्यांनी तक्रारही दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन”असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोग व पोलिसांत तक्रार केली होती.