उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. तसं जरी असलं तरी तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता याचमुळे ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

उर्फी जावेदने छोट्या पडद्यावर तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधी ती ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. तर त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ती सनी लिओनीच्या ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमातही सहभागी झाली. या दोन्ही कार्यक्रमातील तिचं काम खूप चर्चेत आलं होतं. तिच्या वक्तव्यांमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर त्या पाठोपाठ आता ती स्टंटबाजी करताना दिसणार आहे असं बोललं जात आहे.

Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Concussion Substitute नियम काय आहे? शिवम दुबेऐवजी हर्षित राणाच्या समावेशाने इंग्लंडचा संघ का नाराज?
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Pune voters supported BJP in elections but BJP ignored and cheated punekars Former Congress mla mohan Joshis allegation
भाजपने पुणेकरांची फसवणूक केली? काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
Interstate gang of asphalt thieves arrested with valuables
डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी मुद्देमालासह पकडली
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत

आणखी वाचा : प्रसिद्ध यूट्यूबरच्या एकाच वेळी गरोदर असणाऱ्या दोन्ही पत्नींचं साजरं झालं डोहाळे जेवण, पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं १३ वं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पर्वासाठी या कार्यक्रमाची टीम स्पर्धकांच्या शोधात आहे. ‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘खतरों के खिलाडी १३’च्या टीमने उर्फी जावेदला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे. इतकंच नाही तर उर्फीने देखील तिचा होकार कळवला आहे. त्यांचा करार निश्चित झाला तर उर्फी लवकरच रोहित शेट्टी आणि टीमबरोबर आफ्रिकेला या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी रवाना होईल.

हेही वाचा : “माझी मानसिक स्थिती…” सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे उर्फी जावेदला होतोय त्रास

दरम्यान रोहित शेट्टीने ‘खतरों के खिलाडी १३’साठी शिव ठाकरेला देखील विचारणा केल्याचं समोर आलं होतं. या वृत्ताला दुजोरा देत “माझी त्यांच्याबरोबर एक मीटिंग झाली आहे पण मी त्यांच्याबरोबर कुठलाही करार अद्याप केलेला नाही,” असं शिवने सांगितलं. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये कोण कोण स्पर्धक दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader