बिग बॉसच्या घरात झालेली मैत्री खऱ्या आयुष्यातदेखील टिकणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो. अनेक स्पर्धक फक्त शोसाठी मैत्री करताना दिसतात; मात्र शोबाहेर त्यांच्यात सख्य दिसत नाही. परंतु, काहीजण शोबाहेरही आपली मैत्री जपताना दिसतात. आता बिग बॉस मराठी ५ मधील काही सदस्य पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये इरिना रुडाकोवा आणि वैभव चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये धनंजय पोवारची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

अरविंद दिवासे या सोशल मीडिया वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वैभव चव्हाणनेदेखील इन्स्टाग्रामवर स्टोरीला शेअर केला आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Visit Temple
Video : लग्नानंतर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला निघाले देवदर्शनाला; नागार्जुन होते सोबतीला, व्हिडीओ आला समोर

या व्हिडीओमध्ये वैभव चव्हाण कोल्हापूरला गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्याबरोबर इरिना रुडाकोवादेखील आहे. व्हिडीओमध्ये धनंजय पोवार, इरिना व वैभव हे मंदिरात आले असून, ते अंबाबाईचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इरिना मंदिर परिसरातील एका झाडाखाली बसल्याचे दिसत आहे.

अरविंद दिवासे इन्स्टाग्राम

जेव्हा सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकून घरी परतला होता. त्यावेळी वैभव चव्हाण आणि इरिना यांनी त्याच्या घरी भेट दिली होती. त्याबरोबरच सूरजचे कौतुक करीत त्याचा प्रसिद्ध झापुक झुपूक हा डायलॉग म्हटल्याचे इरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते.

आता वैभव आणि इरिनाने कोल्हापूरला जात अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. त्यांच्याबरोबर धनंजय पोवारदेखील दिसत आहे. धनंजय पोवारने बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत वैभव चव्हाण मित्र म्हणून माझ्यापासून दूर गेलेला मला आवडणार नाही, असे म्हटले होते. तर, वैभवनेदेखील अनेकदा धनंजय पोवार चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: दिलीप कुमार यांना लग्नानंतर काही दिवसांनी ‘पहिलं प्रेम’ असलेल्या मधुबालाने भेटायला का बोलावलं होतं? ‘अशी’ होती सायरा बानोंची प्रतिक्रिया

दरम्यान, बिग बॉस मराठीमध्ये इरिना आणि वैभव यांच्यातील मैत्री प्रेक्षकांना आवडत होती. मात्र, धनंजय पोवार आणि वैभव चव्हाण यांच्यातील मैत्री शोनंतरही दिसत आहे. कारण- बिग बॉसच्या घरात दोघेही वेगवेगळ्या गटांतून खेळत असल्याचे पाहायला मिळत होते.

धनंजय पोवारनेदेखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये शाळेतील मुलांनी त्याच्यासहित वैभव आणि इरिनाभोवती गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला त्याने ‘कमाई…’, अशी कॅप्शन दिली आहे.

धनंजय पोवार इन्स्टाग्राम

आता बिग बॉसनंतर या सगळ्या स्पर्धकांमध्ये कसे नाते असणार आणि त्यांच्या करिअरची वाटचाल पुढे कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader