बिग बॉस मराठी ५’चे पर्व संपले तरीही यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांची बिग बॉसच्या घरात झालेल्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगताना दिसली होती. अनेकांनी गेमसाठी ही मैत्री असल्याचे म्हटले होते. मात्र, वैभव-इरिनाची ही मैत्री बिग बॉसच्या घराबाहेरदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या शोनंतर हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

वैभव आणि इरिनाच्या रोमँटिक व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदा उरकून टाका…”

सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर वैभव आणि इरिनाने त्याच्या घरी जात त्याची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोघेही एकत्र धनंजय पोवारच्या घरी गेल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर वैभव आणि इरिनाने पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करतानादेखील दिसतात. आता वैभव आणि इरिनाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत असल्याचे दिसत आहे.

bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”

इरिना आणि वैभवने जिममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा रोमँटिक व्हिडीओ असून, पार्श्वभूमीवर ‘ना देखो ना’ हे गाणे लावले आहे. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडत असल्याचे त्यांच्या कमेंट्समधून पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “यंदा टाका उरकून मग.” दुसरा एक नेटकरी म्हणतो, “खरी ट्रॉफी तर हाच जिंकलाय.” आणखी एका नेटकऱ्याने, “उत्तम जोडी”, असे म्हटले आहे. एकंदरीत नेटकऱ्यांनी त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे.

आणखी काही नेटकऱ्यांनी, “बारामतीची सून, मस्त जोडी”, “ते अरबाज आणि निक्कीपेक्षा खूप चांगले आहेत”, “लई भारी”, बारामतीचे २ चव्हाण बिग बॉसमध्ये सर्वांवर भारी पडले, दोन ट्रॉफी दिल्या बारामतीला”, “फॉरेनची पाटलीण २”, अशा कमेंट्स केल्या आहेत.

बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांनीदेखील यावर कमेंट केली आहे. त्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये इरिना आणि वैभवला टॅग करीत म्हटले, “लई भारी, खूप प्रेम”.

हेही वाचा: OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी

दरम्यान, बिग बॉस मराठी ५ नंतर एका मुलाखतीत वैभव चव्हाणला त्याच्या आणि इरिनाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्याने आमच्यात फक्त मैत्री आहे. ही मैत्री कायम अशीच राहू दे, अशी माझी इच्छा आहे, असे त्याने म्हटले होते.

Story img Loader