सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता झाला आहे. या यशाबद्दल त्याचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’नंतर सूरज आपल्या गावी परतला आहे. आता इरिना आणि वैभव सूरजच्या घरी गेले आहेत.

‘जाहीर सभा’ या यूट्यूब चॅनेलने इरिना आणि वैभव सूरजच्या घरी गेल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इरिनाने सूरजचे कौतुक केले आहे. तिने म्हटले, “सूरज साफ हृदयाचा आहे, छान माणूस आहे, त्यामुळे त्याने ट्रॉफी जिंकली याचा आनंद आहे, मी खूप खूश आहे.”

Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert (1)
Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…

वैभवने ग्रँड फिनालेच्यावेळी सूरजच्या घरच्यांची राहण्याची सोय केली होती. त्यावर सूरजने, “त्याने मला पाठिंबा दिला, तो चांगला आहे”, असे म्हटले. यावर बोलताना वैभवने म्हटले, “असं काही नाहीये, हे सगळे माझ्या घरचे आहेत, कोणाला दाखवण्यासाठी काही केलं नाहीये; मी माझ्या घरच्यांची सोय केली राहण्यासाठी एवढंच होतं. या गोष्टीला जास्त वाव देऊ नका”, असे वैभवने म्हटले.

सूरज चव्हाणने यावेळी म्हटले, “वैभव मला म्हटलेला, बारामतीत बिग बॉसची ट्रॉफी आली पाहिजे; मी आणली. याच व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सूरजच्या घरच्यांनी इरिना आणि वैभवचे औक्षण करून स्वागत केले आहे.

इरिनाने शेअर केला व्हिडीओ

याबरोबरच इरिनानेदेखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सूरज, वैभव आणि इरिना दिसत आहेत आणि ते एकमेकांबरोबर गुलीगत, झापुक झुपूक हा सूरजचा प्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने “सूरज, अभिनंदन पुन्हा एकदा”, अशी कॅप्शन दिली आहे.

इन्स्टाग्राम

दरम्यान, बिग बॉसच्या घरात वैभव आणि सूरज दोन वेगवेगळ्या गटांत होते. त्यांच्यात मोठे भांडण झाल्याचेदेखील दिसले होते. मात्र, घराबाहेर पडल्यानंतर अनेक मुलाखतीत सूरज आणि माझ्यात मैत्री आहे, असे वैभवने म्हटले होते. वैभव चव्हाणने सूरजबद्दल बोलताना म्हटले होते, “आम्ही बिग बॉसच्या घरात जाण्याआधीपासून एकमेकांना ओळखतो. बाहेर येताना मी त्याला सांगितले होते की, ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे. त्याच्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. तो आल्यानंतर आम्ही ते ठरवू”, असे वैभवने म्हटले होते.

हेही वाचा: Video: खरी मंजुलिका कोण? ‘भूल भुलैय्या ३’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; झळकली माधुरी दीक्षित!

आता ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजचा इथून पुढचा प्रवास कसा असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader