टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. २९ वर्षीय अभिनेत्रीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर पोलीसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. ज्यात तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचा माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तेजाजीनगर पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या या एक्झिटनंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण आत्महत्येचं गंभीर पाऊल उचलण्याआधी वैशालीने तिचा मित्र आणि अभिनेता विकास सेठी आणि त्याची पत्नी जान्हवी राणा यांना कॉल केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इ-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार वैशाली ठक्करचं जान्हवी आणि विकास यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं आणि तिने त्यांना लवकरच भेटण्याचं वचन दिलं होतं. एवढंच नाही तर मुंबईला आल्यावर एकत्र शॉपिंग करण्याचा प्लान ती करत होती. अभिनेत्रीच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचं डिसेंबर महिन्यात कॅलिफॉर्नियामध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरशी लग्न होणार होतं. पण त्याआधीच तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.

आणखी वाचा- एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळली होती वैशाली ठक्कर, सुसाइड नोटमधून झाला मोठा खुलासा

वैशालीबद्दल बोलताना जान्हवी राणा म्हणाली, “मी वैशालीला एक दिवस अगोदरच आर्थिक मदतीसाठी कॉल केला होता. त्यावेळी तिने दिवाळीनंतर लग्नाच्या शॉपिंगसाठी मुंबईला येणार असल्याचं सांगितलं होतं. ती आमच्या घरी येणार होती. आपण फिरायला जाऊ आणि मुलांनाही आपल्यासोबत नेऊयात असंही तिने यावेळी सांगितलं होतं. तिने पाच महिन्यापूर्वीच तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझं व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं होतं. तो खूप समजूतदार मुलगा आहे.”

आणखी वाचा- Video : “ओव्हरअ‍ॅक्टिंग करु नकोस…” शिव ठाकरे संतापला

याशिवाय विकास सेठी म्हणाला, “वैशाली डिसेंबरमध्ये लग्न करणार होती. दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या लग्नाची तारीख ठरवणार होते. जेव्हा मी शुक्रवारी १४ ऑगस्टला तिच्याशी बोललो तेव्हा तिने सर्व काही छान चालल्याचं सांगितलं होतं. तिने मला हेही सांगितलं होतं की आपण एकत्र शॉपिंग करू आणि मी तुम्हाला पार्टी देणार आहे. लग्नाआधी मुंबईला येण्याच्या प्लानबद्दलही तिने सांगितलं होतं. पण आता तिच्या निधनाच्या वृत्ताने आम्ही हादरलो आहोत. सुरुवातीला आम्हाला हे सर्व खोटं आहे असं वाटत होतं. पण नंतर तिच्या वडिलांनी कॉल करून याबाबतची माहिती दिली.”

दरम्यान २८ एप्रिल २०२१ ला वैशाली ठक्करचा केनियातील डेंटिस्ट डॉ अभिनंदन याच्याशी साखरपुडा झाला होता. अभिनेत्रीने रोका सेरेमनीचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसेच जून २०२१ मध्ये तिचं लग्न होणार होते पण नंतर अभिनेत्रीने करोनामुळे ते रद्द केलं. जेव्हा परिस्थिती ठीक होईल तेव्हा लग्न करू असं तिने सांगितलं होतं पण नंतर तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलिट केला होता. त्यामुळे तिचं लग्न मोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaishali takkar call her best friend vikas sethi before suicide mrj