टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केली. तिने तिच्या इंदोरमधील घरी गळफास घेत जीवन संपवलं. रविवारी तिच्या आत्महत्येची माहिती समोर आली. वैशाली ठक्करच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठवला होता. त्यानंतर पोलिसांना एक सुसाइड नोटही आढळून आली. ज्यात वैशाली तिचा शेजारी राहुल नवलानीवर गंभीर आरोप केले आहेत. अशात आता तिचा अखेरचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. तिच्या सहकारी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. वैशालीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली शेवटची पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्यात हसत हसत वैशाली जीव देण्याबद्दल बोलताना दिसते. अखेरच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये वैशाली ठक्कर एका डायलॉगवर लिपसिंक करताना दिसत आहे. ती म्हणते की, “बेबी मै तुम्हारे लिए एक गाना गाऊ”, यानंतर ती ‘दिल जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिये जान भी दे दू’ हे गाणं गाताना दिसते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा- “आई- बाबा आता खूप झालं…” वैशाली ठक्करच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; ‘या’ दोघांच्या नावांचा उल्लेख

दरम्यान वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबर दुपारी १२.३० वाजता इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र त्याआधी तिने तिच्या आई- वडिलांसाठी एक नोट लिहिली होती. ही नोट पोलिसांनी जप्त केली होती आणि त्याचबरोबर तिची खासगी डायरीही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये बरेच धक्कादाय खुलासे केले असून यात तिने तिचा शेजारी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा-डिसेंबरमध्ये होतं वैशाली ठक्करचं लग्न, आत्महत्येच्या एक दिवस आधी मित्राला कॉल केला अन्…

वैशाली ठक्करने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. मात्र ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यामधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार वैशाली ठक्करने राहुल नवलानीवर गंभीर आरोप केले आहेत. राहुलने फसवणूक करून तिचे फोटो क्लिक करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते. तिचा होणारा नवरा मितेश कॅलिफोर्नियामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याआधी अभिनेत्रीचं लग्न केनियातील डेंटिस्ट सर्जन डॉ. अभिनंदनशी ठरलं होतं. मात्र नंतर ते काही कारणानं मोडल्याच्या चर्चा झाल्या होत्या.