अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचे प्रकरण रोज नवं वळण घेत आहे. तुनिषाच्या एक्सबॉयफ्रेंड म्हणजेच शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. शिझानने तुनिषाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. शिझानच्या बहिणींनी मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबरोबरच तुनिषाचा मोबाईल अनलॉक करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि त्या मोबाईलमधून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना त्यात शिझानच्या कुटुंबियांचे मेसेज सापडले. यावरून त्याच्या कुटुंबियांच्या चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिझानच्या चौकशीदरम्यान वळीव पोलिसांच्या हाती एक वेगळीच माहिती लागली आहे.

आणखी वाचा : “माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार…” बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचा दावा

‘एनएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या आधी तुनिषा आणि शिझान यांच्यात चांगलीच वादावादी झाल्याचं पोलिसांनी उघड केलं आहे. शिवाय या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजही वळीव पोलिसांच्या हाती लागलं आहे. या प्रकरणातील ही नवी माहिती उघड होताच कोर्टानेसुद्धा शिझानची कोठडी वाढवली आहे.

तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. “शिझान व त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला. मला कुत्रे आवडत नाहीत. तरी मला सरप्राइज देण्यासाठी सांगितलं”, असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valiv police clarifies that on that day tunisha sharma and sheezan khan had a heated argument avn