मालिकेत पुढच्या भागात काय घडणार याची जितकी प्रेक्षकांना उत्सुकता असते तितकीच शूटिंग करताना काय गमती जमती घडतात, हे पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक उत्सुक असतात. मालिकांचे शूटिंग कसे होते, सेटवर काय धमाल होत असते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात आतुरता असते. सोशल मीडियामुळे अनेकदा प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या मालिकांच्या शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ पाहायला मिळतात. आता ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj)ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वल्लरी विराजने शेअर केला शूटिंगचा व्हिडीओ
वल्लरी विराजने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या शूटिंगचा आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, मालिकेतील रोमँटिक सीन शूट केले जात आहेत. मालिकेतील अभिराम ऊर्फ एजे म्हणजेच अभिनेते राकेश बापट व मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराज यामध्ये दिसत आहेत. एजे व लीला यांच्यातील काही रोमँटिक सीनचे शूटिंग करतानाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या शेवटी राकेश बापट आपली जीभ बाहेर काढून दाखवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, हा व्हिडीओ क्यूट वाटत आहे पण नंतर डिलीटही करू शकते.
वल्लरी विराजने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना पसंत असल्याचे त्यांनी केलेल्या कमेंट्समधून दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “राकेश बापट सर आणि वल्लरी यांचा सीन खूप छान होता”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “प्लीज डिलीट नका करू, हा सीन खूप छान आहे.” अनेकांनी हा व्हिडीओ डिलीट नका करू असे म्हटले आहे, तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
हेही वाचा: Video: “मला तुझं तोंडही…”, आशू शिवाला घराबाहेर काढणार; मालिकेत नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. लीला, एजेपासून ते एजेच्या तिन्ही सुना, मुले, आजी, लीलाच्या घरचे सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालताना दिसतात. आता लीला एजेच्या प्रेमात असून ती सतत स्वप्ने पाहताना दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार, एजे लीलाच्या प्रेमात कधी पडणार, लीला तिच्या तिन्ही सुनांचं मन कधी जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.