‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. मार्च महिन्यात या कार्यक्रमाची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलिया टूरवर गेली होती. परदेशातील प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अनेकदा हास्यजत्रेतील कलाकार परदेश दौऱ्यावर जात असतात. याठिकाणी या सगळ्या कलाकारांनी मिळून धमाल केल्याचं अनेक व्हिडीओजमध्ये पाहायला मिळालं. सध्या वनिता खरात आणि पृथ्वीक प्रतापचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप जबरदस्त डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हन हम ले जाएंगे’ या चित्रपटातील “प्यार दिलों का मेला है…” या लोकप्रिय गाण्यावर हास्यजत्रेतील विनोदवीरांची ही जोडी थिरकली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…
Amazing dance on the street on the marathi song lallati bhandar viral video on social media
भररस्त्यात देवीचा “जागर” “लल्लाटी भंडार” गाण्यावर भन्नाट डान्स, व्हायरल VIDEOने जिंकली नेटकऱ्यांची मनं

हेही वाचा : “चंदनाच्या काठीवर शोभे…”, हिरव्या साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज

वनिता आणि पृथ्वीकचा ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी एकदम बॉलीवूड अंदाज पाहायला मिळाला. “सूचना – हा डान्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे.” असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या नारकरांनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केला लेकाबरोबरचा जुना फोटो; म्हणाल्या, “संतूर आई…”

वनिता-पृथ्वीकचा ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारी करण्यात आलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, हेमांगी कवी या कलाकारांनी देखील त्यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय “जास्त viral करू नका Oscar मिळायचा नाहीतर”, “भांडुपचा शाहरुख सलमानच्या गाण्यावर नाचतोय”, “तिकडे श्रीलंका अजून लांब जायला लागलीय..तुमच्या तांडवान”, “जबरदस्त…” अशा कमेंट्स या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहे.

Story img Loader